पुणे : अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यालाही मोठा फटका बसलाय. मुसळधार पावसानंतर भोर तालुक्यातील 12 गावं अंधारात गेलीत, तर 7 गावांचा संपर्क तुटलाय. याशिवाय डोंगराला भेगा पडल्याने शेजारील संपूर्ण कोंढरी गावाचं स्थलांतर केलंय. या गावातील सर्व लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.
घाटमाथ्यावर सलग पडणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. कोंढरी गावात सलग 3 वर्षांपासून भुस्खलन होत आहे. त्यामुळे या वर्षी सुद्धा गावातील 40 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
VIDEO: सरकार कोंढरी गावचे तळीये-माळीण होण्याची वाट पारतंय का? : आमदार संग्राम थोपटे@INCMaharashtra #Pune #Bhor #Khondhari #LandSliding pic.twitter.com/s7f3cbaCeL
— Pravin Sindhu | प्रविण सिंधू ??✊ (@PravinSindhu) July 25, 2021
आमदार संग्राम थोपटे यांनी कोंढरीतील परिस्थितीवरुन सरकारवर हल्लाबोल केलाय. शासन कोंढरी गावचं तळीये किंवा माळीण होण्याची वाट पहात आहे का? असा सवाल संग्राम थोपटे उपस्थिती केला. संग्राम थोपटे म्हणाले, “भोर तालुक्यातील कोंढरी गाव व मुळशी तालुक्यातील घुटगी या दोन्ही गावांच्या डोंगरमाथ्यावर मोठी चीर पडली. अनेक वर्षांपासून ही डोंगरातील भेग वाढत चालली आहे. पावसानंतर ती अधिक वाढते. त्यामुळे या डोंगराच्या खाली राहणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण झालाय.”
Heavy Rain in Pune no contact with many villages