पुणे – गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील( Savitribai Phule Pune University) वसतिगृहे(Hostels) सुरु करण्याच्या विद्यार्थ्यांच्या मागणीला अखेर यश आले आहे. येत्या सोमवारपासून (दि. 21)विद्यापीठातील पीएच.डी. व स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांसाठी(Students) वसतिगृह सुरु केली जाणार आहेत. विद्यापीठ प्रशासनाच्या निर्णया विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबरोबरच विद्यापीठातीलइतर अभ्यासक्रमाची वसतिगृहेदेखील ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यात येत आहेत, असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी संघटना वसतिगृह सुरु करण्याची मागणी करत होती. याबाबत कुलगुरूंनाही निवेदन देण्यात आले होते.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागली दोन वर्षांपासून विद्यापीठातील सर्वच वसतिगृह बंद आहे. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर वसतिगृह बंद असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोईचा सामना करावा लागत होता. याबाबत विद्यार्थ्यांनी सातत्याने मागणे करूनही वसतिगृह सुरु होत नव्हती. याच दरम्यान राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत पुणे विद्यापीठात बैठकीसाठी आले असता. विद्यार्थी संघटनाही त्यांची भेट घेऊन आपली अडचण त्यांना सांगितली व वसतिगृह पुन्हा सुरु करण्याची मागणी केली. त्यानंतर उदय सामंतांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेता तातडीने वसतिगृहे सुरु करण्याच्या क सूचना विद्यापीठ प्रशासनाला दिल्या. वसतीगृहसुरु झाल्यामुळे ग्रामीण भागातून विद्यापीठात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विद्यार्थ्यांना आता विद्यापीठातच थांबून आपला अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे.
VIDEO: बिहारच्या मधुबनी रेल्वे स्थानकात एक्सप्रेस पेटली, अनेक डबे जळून खाक; कोणतीही जीवित हानी नाही
Latur Division : ज्वारी क्षेत्रात घट, हरभऱ्यात दुपटीने वाढ, मुख्य पिकाकडेच का होतेय दुर्लक्ष?
दोन हातांनी Tractor उचलतोय हा मुलगा, खरं नाही वाटत! Viral video पाहा आणि तुम्हीच ठरवा