पुणे : भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर काल पिंपरीत शाई फेकण्यात आली. याबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, घडलेला प्रकार प्री प्लान होता. याचे सगळे पुरावे आता कागदावर आले आहेत. या निमित्ताने मी सुषमा अंधारे यांनाही तेच म्हटलं. निषेध करायचा होता की मला जखमी करायचं होतं. माझ्या डाव्या डोळ्याला कॅन्सर होता. माझ्या डोळ्यातला एक भाग गोधडीसारखा शिवलेला आहे.
बाबासाहेबांनी सांगितलं की प्रत्येक गोष्ट कायद्याने होणार. पण तुम्ही कायदा हातात घेतला. मला डायरेक्ट मारायचं होतं की जखमी करायचं होतं की, ही निषेधाची पद्धत आहे का, असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी केला.
आज आम्ही कलेक्टर कचेरीसमोर निदर्शने केली. कलेक्टर यांना सगळे पुरावे दिले. नेम धरून डोळ्यावर शाई फेकली. माझ्या डॉक्टरने पाहिल्यानंतर डॉक्टर अस्वस्थ झाले. डॉक्टर म्हणाले, तुम्ही दवाखान्यात येईपर्यंत मी घरी जाणार नाही. मी रात्री बारा वाजता दवाखान्यात गेलो.
पोलीस कर्मचाऱ्यांबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले, तो मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री यांचा विषय आहे. सस्पेन्शमुळे कुटुंब डिस्टर्ब होतं. ट्रान्सफरबाबतचा निर्णय हा मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्र्यांचा आहे.दाखल गुन्ह्यांबाबत मी बोलणार नाही.
तुम्हाला अडीच वर्ष जनतेचा पैसा असूनसुद्धा तुम्ही काही केलं नाही. पैसा जनतेचाच असतो. महाराष्ट्रामधून अधिकाधिक रेवेन्यू क्रियेट करण्यासाठी डोकं वापरायचं असतं. गोव्याचे मुख्यमंत्री कुटुंब चालवल्यासारखं सरकार चालवायचे.
पैसा लोकांचा असतो. तुम्ही अडीच वर्ष आराम केला. तुम्ही साधी जी नियमित कर्ज भरणाऱ्या बाबतची घोषणा केली, ती तुम्ही पूर्ण केली नाही. समृद्धी महामार्ग हा लोकांच्या पैशातून झाला. हे उद्धवजी यांनी शहाणपण शिकवण्याची गरज नाही. तुम्ही घरात बसलात. एकदाही मंत्रालयात आला नाहीत. आता बापलेक प्रवास करत आहात, अशी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
गुन्हेगारांवर कलम मी लावली नाही. प्रशासनाने लावली प्रशासनाला जाब विचारा. ज्यांच्यावर लावली त्यांना कोर्ट आहे. भुजबळ यांना कोर्टाने जामीन दिला. भुजबळ जामिनावरच आहेत. भुजबळ साहेब यांना जसा कोर्टाने न्याय दिला. जसा संजय राऊत यांना दिला तसा त्यांनाही मिळेल, असंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.