VIDEO: साडेतीन लोकांना अटक करण्यासाठी उद्धव ठाकरे मुहूर्त शोधत होते का?, किरीट सोमय्यांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

| Updated on: Feb 14, 2022 | 5:37 PM

शिवसेना नेते संजय राऊत (Kirit Somiaya) यांनी उद्या पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचं जाहीर केलं आहे. उद्याच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपचे साडेतीन लोक तुरुंगात असतील असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यावर भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somiaya) यांनी खुलं आव्हानच दिलं आहे.

VIDEO: साडेतीन लोकांना अटक करण्यासाठी उद्धव ठाकरे मुहूर्त शोधत होते का?, किरीट सोमय्यांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान
साडेतीन लोकांना अटक करण्यासाठी उद्धव ठाकरे मुहूर्त शोधत होते का?, किरीट सोमय्यांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान
Follow us on

पुणे: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी उद्या पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचं जाहीर केलं आहे. उद्याच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपचे साडेतीन लोक तुरुंगात असतील असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यावर भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somiaya) यांनी खुलं आव्हानच दिलं आहे. पत्रकार परिषदा कसल्या घेता. सरकार तुमचंच आहे. थेट कारवाई करा. मला टाका ना जेलमध्ये, मी येतो बॅग भरून, असं सांगतानाच साडे तीन लोकांना अटक करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) मुहूर्त शोधत होते का? असा संतप्त सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच इश्यू डायव्हर्ट करण्यासाठीच उद्याची पत्रकार परिषद होत आहे. पण मी मुद्द्यावरून हटणार नाही. जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये घोटाळा झाला आहे. सर्वच त्यात सहभागी आहेत. त्यामुळे सर्वच घाबरले आहेत, असा दावाही सोमय्या यांनी केला.

किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर घणाघाती हल्ला चढवला. उद्या शिवसेनेची पत्रकार परिषद होणार आहे. प्रत्येक पक्षाला पत्रकार परिषद घेण्याचा हक्क आहे. सोमय्यांनी गुन्हा केला असेल तर मी कायदेशीर प्रक्रियेला सहकार्य करणार. पण इश्यू डायव्हर्ट करण्यासाठी कोणी तरी सकाळी उठून पाच पानी पत्र रिलीज करणार… ईडीने डेकोरेटरला बोलवलं डोक्यावर बंदूक ठेवली, असं सांगणार याला काही अर्थ नाही. ज्याच्या डोक्यावर बंदूक ठेवली त्याला समोर आणलं पाहिजे. त्याने पोलीस ठाण्यात तक्रार केली पाहिजे. त्यांनी पत्रं लिहून पाच दिवस झाले. ते प्रकरण संपलं. म्हणून ते इश्यू डायव्हर्ट करण्यासाठी उद्या पत्रकार परिषद घेत आहेत, असा टोला सोमय्या यांनी लगावला.

अरे बाबा, कर ना माझ्यावर कारवाई

कोव्हिड घोटाळा झालेला आहे. सर्व त्यात फसले आहेत. जनतेला उत्तर देऊ शकत नाही. म्हणून साडेतीन लोकं, एक लोकं.. दोन लोक सुरू आहे.,. अरे बाबा मी गुन्हा केला असेल, भ्रष्टाचार केला असेल, सत्तेचा दुरुपयोग केला असेल तर कर ना माझ्यावर कारवाई. वाट कसली पाहाताय? साडेतीन लोकांना अटक करण्यासाठी उद्धव ठाकरे काय मुहूर्त शोधत होते काय? असा सवाल त्यांनी केला.

मी सोडणार नाही

मला इश्यू डायव्हर्ट करायचा नाही. कोव्हिड काळात माफीया सेनेने कमाई केली. कोव्हिड रुग्णाच्या जीवाशी खेळ केला आहे. त्याला जनता माफ करणार नाही. मीही सोडणार नाही. राऊत, उद्धव ठाकरेंनी माझ्या प्रश्नाला उत्तर दिलं नाही. त्यांनीच कंत्राट केलं. त्यांनीच कंपनी ब्लॅकलिस्ट केली. मी नाही केलं, असंही ते म्हणाले.


संबंधित बातम्या:

‘शिवसेना म्हणजेच महाराष्ट्र आणि उद्या अवघा महाराष्ट्र बोलेल’, संजय राऊतांचा भाजप, केंद्रीय तपास यंत्रणांचा निर्वाणीचा इशारा

माझी पत्रकार परिषद खुद्द मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार, संजय राऊत उद्या काय “बॉम्ब” फोडणार?

कितीही वाचवण्याचा प्रयत्न करा, अनिल परबांना तुरुंगात जावंच लागेल; किरीट सोमय्या