फिरायचा मूड असेल तर चला येथे…, ट्रेकिंगसह करा नवीन वर्षाचं स्वागत, निसर्गासोबत साहसी होणार ट्रीप

| Updated on: Dec 22, 2022 | 9:10 PM

कास पठारात फुलांच्या ८५० प्रजाती आहेत. रोज तीन हजार पर्यटकांना कास पठारात जाण्याची परवानगी आहे.

फिरायचा मूड असेल तर चला येथे..., ट्रेकिंगसह करा नवीन वर्षाचं स्वागत, निसर्गासोबत साहसी होणार ट्रीप
Follow us on

पुणे : ख्रिसमसपासून नवीन वर्षापर्यंत आपण सर्व सुटीच्या मूडमध्ये असतो. यादरम्यान, बरेच लोकं फिरण्यासाठी चांगल्या आणि सुंदर जागेच्या शोधात असतात. काही लोकं साहसी खेळाला पसंती देतात. पण, त्यासोबतच नैसर्गिक ठिकाणही हवं असतं. तसंच ट्रेकिंग करण्याजोगी जागा शोधली जाते. आता आपण पाहुयात पुण्याजवळील अशा काही जागा ज्याठिकाणी नवीन वर्षानिमित्त ट्रेकिंग करता येऊ शकते. पंचगनी : पंचगनी खूप सुंदर पहाडी जागा आहे. सह्याद्रीच्या पाच पहाड्यांमध्ये हे ठिकाण वसलेलं आहे. खूप सुंदर दृश्य पाहता येतील. येथील कृष्णा घाटी हे खास आकर्षण आहे. पंचगनीत टेबल लॅम्प, मेप्रो गार्डन, पारसी पॉइंट आणि पाराग्लायडिंगचाही आनंद लुटता येतो. हे ठिकाण पुण्यावरून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर आहे.

माथेरान : हे ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे. कोणत्याही कालावधीत येथे जाता येऊ शकते. सरकारनं माथेरानला इको सेंसिटीव्ह ठिकाण घोषित केलंय. त्यामुळं आतमध्ये कोणत्याही प्रकारचं वाहन नेता येत नाही. येथे तुम्हाला शांतता मिळेल. फिरण्यासाठी बरेच पॉइंट आहेत. पूजा करण्यासाठी मंदिरं आहेत. हे ठिकाण पुण्यावरून १२० किलोमीटर अंतरावर आहे.

महाबळेश्वर : महाबळेश्वर पुण्याजवळील प्रसिद्ध ठिकाण आहे. कोणत्याही कालावधीत येथे जाता येऊ शकते. पश्चिम घाटातील जंगलात निसर्गरम्य वातावरण आहे. आठवडी सुटी येथे घालविता येऊ शकते. हे ठिकाणसुद्धा पुण्यावरून १२० किलोमीटर अंतरावर आहे.

वेलास बीच : रत्नागिरी जिल्ह्यात वेलास समुद्रतट आहे. वेलास समुद्रतट पुण्यावरून २०० किलोमीटर अंतरावर आहे. येथे कासवं पाळली जातात. वेलासला कासवांचा स्वर्ग असं म्हणतात. वेलास बीचजवळ तुम्ही बनकोट किल्ला आणि हरिहरेश्वर मंदिरात जाऊ शकता.

कास : सातारा शहराच्या पश्चिमेस असलेला कास पठार युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलंय. कास पठारात चारही बाजूला जंगली फूलं फुललेली दिसतात. कास पठारात फुलांच्या ८५० प्रजाती आहेत. रोज तीन हजार पर्यटकांना कास पठारात जाण्याची परवानगी आहे. पुण्यावरून हे ठिकाण १३२ किलोमीटर अंतरावर आहे.