मुंबई : अलीकडेच आलिशान लग्नाचा ट्रेड (Wedding trade) सुरू झाला आहे. प्री वेडिंग शूट केले जाते. मग लग्नाच्या दहा दिवस अगोदर प्री वेडिंग शूटचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले जातात. तसेच हेलिकॉप्टर मधून वधू- वरांची लग्नामध्ये इंट्री होते. इतकेच नाही तर नवरी बुलेट चालवून लग्न मंडपात इंट्री मारते. एखाद्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला लग्नाच्या सजावटीचे आॅर्डर देखील देण्यात येते. या सर्व हाैस पुरवण्यासाठी मात्र पैसांची मोठी उधळणं होते.
इंदापूरमधील अनोखा लग्न सोहळा…
लग्नामध्ये होणारी पैसांची उधळण रोखण्यासाठी इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली येथील शिंदे कुटुंबीयांनी पारंपरिक पद्धतीने बैलगाडीतून नवरी व वऱ्हाड नेऊन एक आदर्शच ठेवला आहे. आश्चर्याची आणि विशेष गोष्ट म्हणजे ही सजवलेली बैलगाडी काही वेळ नवरी देखील चालवली. इंदापूर तालुक्यातील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या भाग्यरत्न मंगल कार्यालयात हा अनोखा विवाहसोहळा 13 तारखेला पार पडला.
नवरी निघाली बैलगाडीतून लग्नाला
इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली येथील गजानन शिंदे यांची मुलगी अक्षदा व फलटण येथील जयसिंगराव कदम यांचा मुलगा दिग्विजय यांचा हा विवाहसोहळा पार पडला. शेटफळ हवेली येथील शिंदे कुटुंब हे शेतकरी कुटुंब आहे. नवरी अक्षदा हिला लहान पासूनच शेतीची आवड आहे. विशेष म्हणजे तिच्या लग्नात तिचे वऱ्हाड बैलगाडीमधून जावे अशी तिचीच इच्छा होती. जुनी संस्कृती, जुन्या परंपरा जपल्या जावेत अशी तिची इच्छा होती, त्यानुसार तिच्या वडिलांनी व नातेवाईकानी तिची ही इच्छा पूर्ण केली.
सध्याच्या युगात हायटेक विवाह सोहळ्याकडे तरुणाईचा कल आहे. मात्र, या सोहळ्याचे कौतुक पंचाकृशित होत आहे. बैलगाडी तून नवरी मुलगी व वऱ्हाड आणणे अशी प्रथा 40 ते 50 वर्षांपूर्वी होती. परंतु काळ बदलला तशी साधने बदलली. त्यासह खर्चाचे प्रमाण वाढले. मात्र या सर्वास फाटा देत जुन्या रूढी परंपरे नुसार जुन्या चालीरितींना उजाळा देऊन समाज एकीकरणासाठी केलेला हा प्रयत्न भावी पिढीसाठी मार्गदर्शन करणारा नक्कीच ठरू शकतो. तसेच बऱ्याच वडिलांना मुलींच्या लग्नासाठी कर्ज काढावे लागते जर अशा पारंपारीक पध्दतीने विवाह झाले तर मुलीच्या बापाला कर्ज बाजारी होण्याची वेळच येणार नाही.
संबंधित बातम्या :
उद्योगनगरी औरंगाबादचे घवघवीत यश, निर्यात करणाऱ्या देशातील टॉप 30 जिल्ह्यांत नंबर लावला!!
Pune Suicide | अवघ्या दोन महिन्यांपूर्वी लग्न, पुण्यातील हॉटेलमध्ये नवविवाहितेचा गळफास