पुणे – महाराष्ट्रात दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्याचे दिसून येते आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (Indian Meteorological Department) अंदाजनुसार राज्यातील अनेक भागात उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती निर्माण झाली आहे. मार्च महिन्यातील तीव्र उन्हाळ्यानंतर आता एप्रिलही अंगाची लाहीलाही करणार असा अंदाज व्यक्त आहे. पुण्यात दिवसाचे तापमान 39.7 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. मात्र एप्रिल दोन दिवसात महाराष्ट्राच्या वेगवेगळया भागात उष्णतेची लाट (Heat wave)निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. येत्या काही दिवसात शहरातील तापमान 40 अंश सेल्सिअस पार करेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. विदर्भ, मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणचे कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे.
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता
राज्यातील पुण्यात किमाल तापमान 39.7 अंश सेल्सिअस आहे तर सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे 43.5 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. विदर्भात निर्माण झालेली उष्णतेची लाट आणखी दोन दिवस राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अकोला, चंद्रपूर, या परिसरात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणच्या कमाल तापमानाने 40 अंशाचा टप्पा पार केला आहे. याबरोबरच कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात येत्या 6 व 7 एप्रिलला तुरळक ठिकाणी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
पुणे – 39.7
परभणी- 42.2
अकोला 43.5
अमरावती42
बुलडाणा 40.2
चंद्रपूर 43.4
गोंदिया 41
नागपूर 41.1
वाशिम 42
वर्धा 42.4
नांदेड -41. 8
उस्मानाबाद 40.9
परभणी 42.2
नाशिक 38.7
सांगली 40.2
सातारा 39.5
सोलापूर 42.8
मुंबई 32.7
रत्नागिरी 31.6
पणजी 33.3
औरंगाबाद40.2
Paytm कॅशबॅक पॉईंट्स ऑफर लाँच, 6 लाखांच्या कारसह Iphone 13 जिंकण्याची संधी
Galapagos tortoise : ‘अभी तो मैं जवान हूँ’; 70व्या वर्षी बाप बनलेल्या ‘या’ कासवाची भलतीच रंगलीय चर्च