पुणे – खेड तालुक्यातील शिवे येथे भामाआसखेड धरणात(Bhamaaskhed dam) पोहण्यासाठी गेलेल्या मामे बहिणीसह भावाचा बुडून मृत्यू (Death ) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रोहन संजय रोकडे (वय 24) व प्राजक्ता देविदास पवार (वय 20, रा. बिरदवडी, ता. खेड) अशी मृतांची नावे आहेत. घटना घडल्यानंतर तब्बल तीन तास शोध घेतल्यानंतर पोलीस, स्थानिक कार्यकर्ते यांना मृतदेह मिळवण्यात यश आले आहे. होळीची(Holi) सुट्टी असल्याने चौघेजण भामाआसखेड धरणावर फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी चौघेही पोहण्यासाठी पाण्यात उतरले. त्यावेळी इतर दोघे पोहून सहीसलामत पाण्याबाहेर आले. मात्र मृत प्राजक्ता व रोहन यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. सणाच्या दिवशी घडलेल्या या दुदैवी घटने दोन्ही कुटुंबावर शोककळा पसरली आहे. परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिरदवडी येथील कुटुंबीय व नातेवाईक एकत्रितपणे शिवे गावच्या हद्दीतील भामा आसखेड धरणावर फिरण्यासाठी गेले होते. त्याचवेळी त्यातील चारजण पाण्यात पोहण्यासाठी गेले होते. त्यातील दोघे व्यवस्थित बाहेर आले. मात्र, रोहन आणि प्राजक्ता यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि चाकण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने सुरुवातीला एक मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. तर वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या मदतीने दुसरा मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे स्थानिकांनी सांगितले. चाकण पोलिस स्थानकात मृत्यूची नोंद रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या घटनेने बिरदवडी गावावर शोककळा पसरली आहे.
Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ; इंधनाचे नवे दर जारी
Medical कॉलेजचा पदव्युत्तर अभ्यासक्रम यावर्षी होणार सुरू; राज्यभरातील विद्यार्थ्यांना सुखद धक्का!
IMD | चंद्रपुरात पारा भडकला, तापमान 43 डिग्री सेल्सिअसवर, विदर्भात 48 तास उष्णतेच्या लाटेचे!