पुणे : ब्रिटनहून परतल्यानंतर कोणतही चाचणी न करता विमानतळावरुन पळून गेलेल्या 35 नागरिकांचा शेवटी शोध लागला आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाची नवी प्रजीत आढळल्यानंतर एकूण 542 जण पुण्यात परतले होते. त्यापैकी 109 प्रवाशी कोरोना चाचणी न करता पळून गेले होते. त्यातील 35 जणांचा आता शोध लागला आहे. त्यानंतर आरोग्य प्रशासनाने त्यांची कोरोना चाचणी केली असून त्यातील 2 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. या दोघांनाही पुण्यातील नायडू रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रवाशांचा शोध घेण्यासाठी पुणे प्रशासनाने पोलिसांसाची मदत घेतली. (in Pune people found who was returned from Britain)
मागील काही दिवसांपासून ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या प्रजातीची लागण होत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर देशात तसेच राज्यात ब्रिटनहून परतलेल्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश देण्यात आरोग्य विभागाने दिले होते. यावेळी ब्रिटनहून पुण्यामध्ये 542 जण परतले होते. त्यातील 109 जणांचा शोध पुणे महानगरपालिका तसेच आरोग्य प्रशासनाला लागत नव्हता. ते कुठलीही कोरोना चाचणी न करता विमानतळावरुन पळून गेले होते. त्यानंतर आता 109 पैकी 35 प्रवाशांचा शोध पुणे प्रशासनाला लागला आहे. त्यानंतर या सर्व प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यातील 35 पैकी दोघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या दोन्ही रुग्णांना नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूच्या नव्या प्रजातीचा संसर्ग सुरु झाल्यानंतर ब्रिटनहून अनेक नागरिक भारतात परतले. या काळात पुण्यात एकूण 542 जण आले. त्यापैकी 109 जणांनी कुठलीही चाचणी न करता घर गाठले. अथक प्रयत्नांनतर त्यापैकी 35 प्रवाशांचा शोध लागला आहे. तर उर्वरित सर्व रुग्ण हे पुण्याबाहेरचे आहे. या सर्व प्रवाशांची यादी पुणे प्रशासनाने राज्य रोग सर्वेक्षण विभागाकडे पाठविली आहे. यावेळी पळून गेलेल्या प्रवाशांचा शोध घेण्यासाठी पुण्याच्या आरोग्य प्रशासने पोलिसांचीसुद्धा मदत घेतली.
हिंदू धर्मात दोन पत्नी अमान्य, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, भाजप महिला आघाडीचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा https://t.co/tVTTxh0nv7 #DhananjayMunde | @BJP4Maharashtra | #BJP | #RenuSharma
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 13, 2021
संबंधित बातम्या :
(in Pune people found who was returned from Britain)