पुणे : लसीचा साठा संपल्याने पुणे शहरात महापालिकेची सर्व लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आलीत. तर दुसरीकडे शहरातील खासगी रुग्णालयात लसीकरण सुरू असल्याने नागरिकांनी खासगी लसीकरण केंद्राबाहेर लांबलचक रांगा लावल्या आहेत. मयूर कॉलनीमधील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या लसीकरण केंद्राबाहेर नागरिकांची लस घेण्यासाठी जवळपास दीड किलोमीटरपर्यत रांग लागलेली पाहायला मिळाली. (In Pune today only private hospitals Corona Vaccination)
पुण्यात आज फक्त खासगी हॉस्पिटलमध्ये लसीकरण सुरु राहणार आहे. कोणत्याही सरकारी लसीकरण केंद्रावर आज लसीकरण होणार नाही. लसीचा साठा संपल्याने आज सरकारी महापालिकेची लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आलेली आहेत, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलधीर मोहोळ यांनी दिली आहे.
महापालिकेची लसीकरण केंद्र हंद असल्याने आज पुणेकरांची पावलं खासगी रुग्णालयाकडे लस घेण्यासाठी वळाली. त्यासाठी पुण्याच्या विविध भागांतून नागरिकांनी विविध खाजगी रुग्णालयांबाहेर गर्दी केली होती. पुण्यातील मयूर कॉलनीमधील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या लसीकरण केंद्राबाहेर नागरिकांची लस घेण्यासाठी जवळपास दीड किलोमीटरपर्यत रांग केली होती.
लसीच्या तुटवड्यामुळे महापालिकेची लसीकरण केंद्र बंद राहणार असल्याची सूचना कालच पुणेकरांना देण्यात आली होती. त्यामुळे पुणेकर नागरिकांनी आपला मोर्चा खाजगी रुग्णालयाकडे वळवला. आज अगदी सकाळी विविध रुग्णालयांबाहेर पुणेकरांनी लसीकरणासारी मोठी गर्दी केली होती.
लसीच्या तुटवड्यावर बोलताना महापौर मोहोळ म्हणाले, “लसींचा पुरवठा न झाल्याने मंगळवार दि. 25 मे रोजी पुणे मनपा हद्दीतील सर्व लसीकरण केंद्र बंद राहणार असून मनपास लस प्राप्त झाल्यावर पुढील लसीकरणाचं नियोजन जाहीर केले जाईल, पुणेकर नागरिकांनी याची नोंद घ्यावी ”
कोरोना लसीकरणासंदर्भात सूचना ! pic.twitter.com/PtA6nNekGM
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) May 24, 2021
(In Pune today only private hospitals Corona Vaccination)
हे ही वाचा :
Weather Updates: पुणेकरांनो सावधान! विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता
जिल्हा परिषद शाळेच्या आवारात चिकन आणि दारु पार्टी! पुण्याच्या खेड तालुक्यातील लाजिरवाणा प्रकार