पुणे – राज्यात शिवजयंती (Shivjayanti 2023) मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. त्या अनुशंगाने महाराष्ट्रातील (MAHARASHTRA) महत्त्वाच्या शहरात गर्दी पाहायला मिळते. लोकांना कुंचबना होऊ नये, यासाठी पोलिस (PUNE POLICE) वाहतूकीत बदल करतात. त्याचबरोबर शिवजयंतीला अनेक ठिकाणी मिरवणुका काढल्या जातात. त्याबरोबर महत्त्वाच्या शहरात जाहीर सभांचं सुध्दा आयोजन करण्यात येत. तरुण मंडळी मिरवणुकीत अधिक व्यस्त असल्याची पाहायला मिळते. पुण्यात प्रत्येकवर्षी गर्दी होत असल्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर तसे आदेश जिल्ह्याधिकारी जारी केले आहेत.
जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरी जुन्नर येथे उद्या शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. आज सकाळी ८ वाजल्यापासून ते १९ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्रीच्या १२ वाजेपर्यंत वाहनांची होणारी गर्दी पाहता आदेश जारी करण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जुन्नर शहर व परिसरामध्ये वाहतुकीत बदल करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहेत.
पुण्यात गडकिल्ल्यांची अधिक संख्या असल्यामुळे तरुणांची अधिक गर्दी असते. त्याचबरोबर आतापासून पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे कसल्याही प्रकारची वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून पोलिसांनी वाहतूकीत बदल केला आहे.