आमदार दत्ता भरणे यांना बनवलं ‘मामा’, फोन करून इमोशल करत हजारोंचा गंडा

| Updated on: Jun 15, 2024 | 5:31 PM

पुण जिल्ह्यातील इंदापूरमधील राष्ट्रवादी पक्षाचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडलेला. फोन करत त्यांना इमोशनल करून त्यांच्याकडून पैसे घेत त्यांची फसवणुक केल्याचं समोर आलं आहे. कोणी केली फसवणुक नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या.

आमदार दत्ता भरणे यांना बनवलं मामा, फोन करून इमोशल करत हजारोंचा गंडा
Follow us on

ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. डिजीटल पेमेंट पद्धतीमुळे सायबर चोरीच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. सर्वसामान्य वयोवृद्ध नागरिक सहज जाळ्यात सापडतात. त्यामुळे या घटनांमध्ये जास्तीत जास्त वयोवृद्ध लोक शिकार ठरतात. मात्र काही सुशिक्षित लोकांनाही याचा फटका बसल्याचं पाहायला मिळालं आहे. अशातच राष्ट्रवादीमधील अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे यांची फसवणुक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. दत्तात्रय भरणे यांना चोरट्यांनी गंडवत इमोशनल करत त्यांच्याकडून ऑनलाईन पैसे घेतले.

नेमकं काय आहे प्रकरण?

मला एक फोन आला की इंदापूर तालुक्यातील दोघांचा अपघात झाला आहे. त्यांच्या मदतीसाठी तात्काळ पंधरा हजार रुपये फोन पे करा असं ते म्हटलं. मी लगोलग मदत करण्याच्या हेतून एका सहकार्याला सांगून फोन पे करत तात्काळ पंधरा हजार पाठवले. पण  इंदापूरमध्ये कोणाचाच अपघात झाला नाही हे समजल्यावर मला लक्षात आलं की आपली फसवणुक झाली आहे. मात्र मी याबद्दल कोणाला काही बोललो नाही. त्यानंतर आणखी एका आमदाराला अशा प्रकारे फसवलं होतं. त्यामुळे आपण योग्य ती खबरदारी घ्यायला हवी, असं दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं.

चोरटे भावनिक साद घालत लुटतात हा प्रकार काही नवीन नाही. याआधी काही अशी प्रकरणे आली आहेत. ज्यामध्ये काही चोरटे पालकांना त्यांच्या मुलांना गरज असून पैशांची मागणी करतात. पालकही भावनेच्या भरात कोणताही विचार न करता पैसे पाठवतात. भावनांशी खेळून तुम्हाला भावनिक करत ते तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतील. त्यासाठी असा काही फोन आला तर एकदा आपल्या मुलांना फोन करत चौकशी करत शहानिशा करून घ्या. जेणेकरून तुम्ही अशा सायबर चोरट्यांचे शिकार होणार नाहीत.

दरम्यान, कधीही कोणत्याही अनोळखी माणसाचा फोन आला आणि ओटीपी मागू लागला तर देऊ नका. चोरटे तुम्हाला बँक, आधार कार्ड, पॅन कार्ड व्हेरिफिकेशनसाठी ओटीपी सांगा असं सांगतील मात्र तुम्ही फोनवर कधीही ओटीपी देऊ नका. नाहीतर तुम्हाला आर्थिक फटका बसेल.