Video : ‘झुमका वाली पोरं; इंदोरीकरांच्या भर कीर्तनात चिमुकल्याचा राडा, मग काय महाराजांनी धरले पाय

| Updated on: Mar 03, 2023 | 11:27 PM

अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या इंदोरीकर महाराज यांच्या कीर्तनामध्ये एका  चिमुकल्याने राडा घातला आहे. त्यांच्यासमोर 'झुमका वाली पोरं' या अहिराणी गाण्यावर डान्स केलाय.

Video : झुमका वाली पोरं; इंदोरीकरांच्या भर कीर्तनात चिमुकल्याचा राडा, मग काय महाराजांनी धरले पाय
Follow us on

पुणे : प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज काहीना काही कारणामुळे कायम चर्चेत असलेले आपण पाहिले आहेत. इंदोरीकर महाराज यांचे कीर्तनाचे कार्यक्रम राज्यभर चालू असतात. आपल्या अनोख्या शैलीत ते कीर्तन सांगतात, अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या इंदोरीकर महाराज यांच्या कीर्तनामध्ये एका  चिमुकल्याने राडा घातला आहे. त्यांच्यासमोर ‘झुमका वाली पोरं’ या अहिराणी गाण्यावर डान्स केलाय. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

नेमकं काय घडलं?

पुण्यातील मोशी येथील हे कीर्तन असल्याची प्राथमिक माहिती समजत आहे. कीर्तन चालू असताना इंदोरीकर महाराज हे समोर बसलेल्या लहान मुलांना काही प्रश्न विचारत असतात. त्यावेळी एक चिमुकला समोर येतो प्रसिद्ध अहिराणी झुमकावाली पोर हे गाणं म्हणत डान्स करतो. हाल सर्व प्रकार पाहिल्यावर त्या लहान मुलाला महारज स्टेजवर बोलावतात.

महाराज त्याला माईक द्यायला सांगतात, चिमुकला स्टेजवर जातो आणि माईकवरही त्याच्या स्टाईलने ते गाणं म्हणतो. इतकंच नाहीतर महाराजही त्याला दाद देताना दिसले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. यादरम्यान कीर्तन ऐकायला आलेल्या सर्वजण हसून हसून लोटपोट झाले होते.

झुमकावाली पोर हे गाणं चांगलंच हिट झालेलं आहे. विनोद कुमावत आणि राणी कुमावत यांचं हे गीत आहे. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी हे गाण अपलोड करण्यात आलं होतं. कमी दिवसात गाणं महाराष्ट्रभर हिट झालेलं पाहायला मिळत आहे.

इन्स्टाग्रावरही रील्सस्टार आणि इतरही रील्स करणाऱ्यांनी या गाण्यावर रील्स केले आहेत. तरूणाईला नाहीतर लहान मुलांनाही या गाण्याची भुरळ पडलेली दिसत आहे.