….अन् आयर्नमॅन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना अश्रू अनावर

| Updated on: Jan 26, 2021 | 8:08 AM

नुकताच एक असा प्रसंग घडला की, आयर्नमॅन कृष्ण प्रकाश त्यांच्या हळव्या मनाचं दर्शन झालं. (IPS Krishna Prakash emotional poem)

....अन् आयर्नमॅन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना अश्रू अनावर
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश
Follow us on

पुणे : पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (Krishna Prakash) यांची आयर्नमॅन म्हणून सगळीकडे ख्याती आहे. सडेतोड वृत्ती, करारी बाणा, कोणत्याही दबावाला बळी न पडता बेधडक आणि कठोरपणे निर्णय घेण्याची क्षमता असलेला पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. पण नुकताच एक असा प्रसंग घडला की, त्यांच्या हळव्या मनाचं दर्शन सर्वांना झालं. त्यांना भेटायला आलेल्या एका मुलीने वडिलांवर कविता ऐकवली आणि आयर्नमॅन म्हणून ओळख असलेल्या कृष्ण प्रकाश यांना अश्रू अनावर झाले. (IPS officer Krishna Prakash become emotional after the listing of girl poem)

नेमक काय घडलं ?

कृष्ण प्रकाश यांना रोज अनेकजण भेटायला येतात. सातारा जिल्ह्यातील ऋतुजा पाटील ही मुलगी सोमवारी (25 जानेवारी) त्यांना अशीच भेटायला गेली. यावेळी या मुलीने कृष्ण प्रकाश यांना तिने लिहलेल्या ‘झुळूक’ या पुस्तकाबद्दल सांगितले. तसेच, वडिलांवर लिहलेल्या ‘देवा घराचा बाबा’ ही कविताही तिने कृष्ण प्रकाश यांना ऐकवली. वडिलांचे निधन झाल्यानंतर आयुष्यात झालेले बदल आणि आलेल्या अडचणींबद्दल या मुलीने आपल्या कवितेत लिहले होते. या कवितेतील हृदयाचा ठाव घेणारे शब्द ऐकताच कृष्ण प्रकाश यांना अश्रू अनावर झाले.

ही कविता ऐकल्यानंतर कृष्ण प्रकाश यांच्या दालनात काही काळासाठी भावुक वातावरण झाले होते. त्यानंतर आलेले अश्रू पुसत कृष्ण प्रकाश यांनी ऋतुजा पाटील या मुलीच्या कवितेला दाद दिली आणि तिच्याकडून पाच पुस्तके विकत घेतली. लहान असताना ऋतुजा पाटील या मुलीच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर लहानपणी आलेले अनुभव आणि खाचखळगे तिने आपल्या कवितेच्या माध्यमातून मांडले आहे.

कृष्ण प्रकाश आपल्या धडाकेबाज कारवायांसाठी प्रसिद्ध आहेत. याआधी त्यांनी अहमदनगरमध्ये गुन्हेगार टोळ्यांवर केलेल्या कारवाईनंतर ते महाराष्ट्रभरात चर्चेत होते. नियमप्रिय आणि शिस्तप्रिय पोलीस अधिकारी म्हणून कृष्ण प्रकाश यांचा लौकिक आहे. ते त्यांच्या फिटनेससाठीदेखील ओळखले जातात. त्यांनी अनेक मॅरेथॉन स्पर्धांमध्ये भाग घेतलाय. दरम्यान, आयर्नमॅन म्हणून ओळख असणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या मनाचा हळवा कप्पा समोर आल्यानंतर नेमक्या काय भावना व्यक्त कराव्यात हे कृष्ण प्रकाश यांच्या सहकाऱ्यांनाही काही काळासाठी समजले नाही.

 

संबंधित बातम्या :

‘वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद होणारा पहिला भारतीय अधिकारी, कृष्ण प्रकाश यांना ‘आयर्न मॅन किताब’

(IPS officer Krishna Prakash become emotional after the listing of girl poem)