देहू – देहू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या लोकार्पण सोहळा संपन्न झाला. मात्र या सोहळ्यानंतर आता अपमान नाट्य रंगले आहे. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना भाषण करू न दिल्याने राष्ट्रवादीकडून केंद्रसरकारावर टीकेचे झोड उठवली आहे. देहू येथील संत तुकाराम महाराज शिळा मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेण्यासाठी आणि त्यांचे राज्याच्या वतीने स्वागत करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार(Ajit Pawar) हे पुणे विमानतळावर हजर होते. राज्याच्या वतीने पंतप्रधानांचे त्यांनी स्वागत केले. देहू येथील कार्यक्रमात उपस्थित राहिले. हा राज्याचा राजशिष्टाचार.अजितदादा पवार यांनी पाळला असून पंतप्रधान कार्यालयाने त्यांचा राजशिष्टाचार का पाळला नाही?असा संतप्त सवाल राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष रविकांत वरपे (Ravikant varpe )यांनी विचारला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पंतप्रधान कार्यालयाने नकार देणे हे कोणत्या पंतप्रधान कार्यालयाचा कोणत्या राजशिष्टाचारात बसते ? अजितदादांच्या भाषणाला नकार देणे हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. महाराष्ट्राच्या अपमानाची परंपरा नरेंद्र मोदी कायम ठेवू पाहत आहेत काय? पंतप्रधान कार्यालयाच्या प्रोटोकॉलमध्ये बसत नसताना देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले. पंतप्रधान कार्यालयाच्या प्रोटोकॉलमध्ये बसत असताना अजितदादा पवार यांच्या देहू येथील भाषणाला पंतप्रधान कार्यालयाचा नकार हे राजकारण राज्यातील भाजपच्या सांगण्यावरून झाले, असा माझा स्पष्ट आरोप आहे. याबाबत पंतप्रधान कार्यालयाने आपली भूमिका जाहीर करावी.
अपमान कोणी व का केला एसआयटी स्थापना करून शोध घ्यावा- सचिन खरात
देहू येथील झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान यांच्या भाषणाच्या अगोदर नियमानुसारनुसार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण होणे हे अत्यावश्यक होते. परंतु देवेंद्र फडणवीस यांचं भाषण झाल्यावर साधं भाषणासाठी अजितदादा पवार यांचं नाव सुद्धा पुकारलं नाही. हा महाराष्ट्र राज्यातील 12 कोटी जनतेचा अपमान आहे. देहूमध्ये सनातनी लोकांनी तुकाराम महाराज यांना त्रास दिला होता. त्याच सनातनी वृत्तीच्या लोकांनी जाणूनबुजून अजितदादा पवार यांना भाषण करू दिले नाही, असा आमचा स्पष्ट आरोप आहे. हा महाराष्ट्र राज्याचा अपमान आम्ही सहन करणार नाही हे कोणी आणि का केले याचा खुलासा होण्यासाठी एसआयटी ची स्थापना करून शोध घ्यावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्ष करत आहे.