JEE Main 2021 Registration : पुणे : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) जेईई मेन्स 2021 चं ब्राउशर (JEE Main 2021 Exam) जारी करण्यात आलं आहे. विद्यार्थी आजपासूनच परिक्षेसाठी अर्ज करु शकतील. तुम्ही jeemain.nta.nic.in वर ऑनलाईन अर्ज करु शकता. जेईई मेन 2021 साठी ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख 15 जानेवारी आहे (JEE Main 2021 Exam).
विद्यार्थ्यांना त्यांच्या सोईने फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या चार महिन्यात कधीही परिक्षा देता येणार आहे. पहिलं सत्र 22 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2021 दरम्यान असेल. यानंतर दूसरं सत्र मार्च, तिसरं सत्र एप्रिल आणि मे महिन्यात चौथं सत्र असेल.
वेगवेगळ्या राज्यांच्या बोर्ड परिभांमध्ये जेईई परिक्षेमुळे कुठली अडचण होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी ही परिक्षा वर्षातून दोनवेळा आयोजित केली जायची.
जेईई मेन्स 2021 च्या पहिल्या सत्रात आय कार्ड जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जारी केले जातील. परीक्षा दोन शिफ्टमध्ये होईल. पहिली शिफ्ट सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत असेल, तर दुसरी शिफ्ट दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत असेल (JEE Main 2021 Exam).
– अर्ज भरण्याची मुदत – 15 डिसेंबर 2020 ते 15 जानेवारी 2021
– शुल्क भरण्याची शेवटची तारीख – 16 जानेवारी 2021
– आय कार्ड मिळण्याची तारीख – 6 फेब्रुवारी 2021
– जेईई मेन्स परीक्षा – 22 ते 25 फेब्रुवारी 2021
– परीक्षेचा निकाल – 6 मार्च
JEE आणि NEET परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा, अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थ्यांना सल्ला#Rameshpokhriyal #cbse #NEET #JEEMain https://t.co/0Agf1D7oZr
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 13, 2020
JEE Main 2021 Exam
संबंधित बातम्या :
सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; दहावीची परीक्षा कधी होणार?
ऑनलाईन परीक्षांमध्ये घोळात घोळ; पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रावर अभाविपचे जोरदार आंदोलन
NEET JEE-Mains Exam Dates | ‘नीट’ आणि ‘जेईई-मेन्स’ परीक्षेच्या तारखा अखेर जाहीर