पुणे – कर्नाटकमध्ये मुस्लिम समुदायाच्या मुलींना हिजाब वापरण्यास बंदी(Prohibition on wearing hijab)घालणाऱ्या कर्नाटक भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (Nationalist Congress Party) वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. गंज पेठेतील फुले वाड्यात हे आंदोलन करण्यात आलं. मुस्लिम महिलांसह (Muslim women)इतरही महिला पारंपरिक वेशभूषेत महिला आंदोलक सहभागी झाल्या होत्या. कर्नाटकमधील काही कॉलेज कॅम्पसमध्ये हिजाबवर बंदी घालण्याची मागणी याचिका उच्च न्यायालयात नोंदवली गेली होती. ‘कर्नाटकात मुस्लीम मुलींसोबत झालेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे. देशात भाजप आणि आरएसएस सध्या महिलांचे जीवन असुरक्षित करत आहेत’, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला. कर्नाटकमध्ये हिजाबवरून सुरू असलेला वादाचे देशभर गाजत आहे.
महाराष्ट्रातही पडसाद
मुस्लीम समुदायाच्या मुलींना कॉलेजमध्ये हिजाब वापरल्याने कॉलेजमध्ये प्रवेशबंदी केली होती. त्यामुळे मुस्लीम समुदायातील मुलींना या निर्णयाच्या विरोधात आंदोलन केले होते. मुस्लीम समुदायातील मुलींना पाठींबा दर्शवत महात्मा फुले वाड्याजवळ राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर निषेध आंदोलन करत कर्नाटकमधील भाजप सरकारचाही निषेध नोंदवला.
नेमकं प्रकरण काय
कर्नाटकातील एका महाविद्यालयाने हिजाब काढण्यास नकार देणाऱ्या सहा विद्यार्थिनींना प्रवेशबंदी केली होती. मात्र हिजाब घालूनच आम्ही महाविद्यालयात येऊ, अशी भूमिका या विद्यार्थिनींनी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून घेतली आहे. त्या प्रकरणावरुन सध्या कर्नाटकात वादंग निर्माण झाला आहे. हिजाब घालणाऱ्या युवतींचा विरोध म्हणून काही संघटना भगवी शाल अंगावर घालून कॉलेजमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहेत. याबरोबर हिजाब घालून महाविद्यालयात आलेल्या तरुणीला अडवण्याची प्रयत्नही करण्यात आला. यावेळी ‘जय श्रीराम च्या घोषणात देत , भगवे झेंडे हात घेऊन तरुणांच्या जमावाने गोंधळ घातला होता.