पुणे – शहारातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयालय (Rajiv Gandhi Zoological Museum) अर्थात कात्रजची बागेला पहिल्याच दिवशी तब्बल 12 हजार पर्यटकांची भेट(Tourists visit ) दिली आहे. पर्यटकांनी दिलेल्या भेटीमुळे प्राणी संग्रहालय प्रशासनाला तब्बल चार लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर 14 मार्च 2020 ला प्राणी संग्रहालय पर्यटकासांठी बंद झाले होते. राज्यासह शहारातील कोरोनाच्या (Corona) रुग्णांची संख्या घटल्याने जनजीवन पूर्वपदावर येत आहे. यामुळे बंद असलेले प्राणी संग्रहालय सुरु करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यानंतर प्राणिसंग्रहालय तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर कालपासून पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. या दोन वर्षात प्राणीसंग्रहालयाचे तब्बल बारा कोटीचे नुकसान झाले आहे. मात्र सुरु झाल्यानंतर पर्यटकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे प्रशासनानेही समाधान व्यक्त केलं आहे.
वाघ, सिंह, बिबट्या, हरीण, गवा, लांडगा, कोल्हा, अस्वल, हत्ती तर चौशिंगा, तरस आदी विविध प्राणी पर्यटकांना पाहता येणार आहेत. तर आगामी काळात झेब्रा आणि इतर काही प्राणी आणण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. त्यासाठी निविदा काढली जाणार आहे. प्राणीसंग्रहालय बंद होते, त्या कालावधीत नव्या प्राण्यांसाठी खंदक तयार करण्यात आले आहेत. विविध विकासकामेही झाली आहेत. अजून काही बाकी आहेत, तीही केली जाणार आहेत.
प्राणी संग्रहालयातील लेपर्ड कॅट शेकरू व जंगल साठे दोन प्राणी पर्यटकांच्य आकर्षणाचा विषय ठरत आहेत. प्राणी संग्रहालय दररोज नागरिकांसाठी सकाळी 9:30 वाजाता सुरु होणार व सायंकाळी 5 वाजता बंद होईल. अशी माहिती संग्रहालय प्रशासनानें दिली आहे.
नाशिकमध्ये भुजबळांकडून ओबीसी लढाईची हाक; सकल धनगर समाजाच्या वतीने राज्यमंत्री भरणेंचा नागरी सत्कार
“हा फौजदारी गुन्हा..”; The Kashmir Files वरून विवेक अग्निहोत्रींची हरियाणा मुख्यमंत्र्यांना विनंती