श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात ‘किरणोत्सव सोहळा’, भाविकांनी अनुभवला अभूतपूर्व सोहळा

| Updated on: Feb 11, 2021 | 11:19 AM

श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात 'किरणोत्सव सोहळा', भाविकांनी अनुभवला अभूतपूर्व सोहळा (kiranotsav ceremony in dagadusheth halwai mandir)

श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात किरणोत्सव सोहळा, भाविकांनी अनुभवला अभूतपूर्व सोहळा
श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात 'किरणोत्सव सोहळा'
Follow us on

पुणे : पुण्यातील मानाचा गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात सध्या किरणोत्सव सोहळा सुरु आहे. आज किरणोत्सव सोहळ्याचा तिसरा दिवस आहे. आज तिसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजून 16 मिनिटांनी सूर्यकिरणांनी मंदिरातील गाभाऱ्यात प्रवेश केला. बाप्पांना स्नान घालण्यासाठी सूर्यकिरणे श्रीं च्या मूर्तीवर पडली आणि गणपती बाप्पा मोरयाचा एकच जयघोष झाला. प्रतिवर्षी माघ गणेशजन्माच्या पार्श्वभूमीवर उत्तरायणामध्ये ही सूर्यकिरणे श्रीं च्या मूर्तीवर पडतात. (kiranotsav ceremony in dagadusheth halwai mandir)

भाविकांनी  अनुभवला किरणोत्सव

किरणोत्सव सोहळा अनुभवण्यासाठी तिसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी अनेक भाविकांनी मंदिरात उपस्थिती लावून सोहळ्याचा आनंद लुटला. सकाळी 8 वाजून 16 मिनीटे ते 8 वाजून 19 मिनिटांपर्यंत हा किरणोत्सव उपस्थितांना पाहता आला. श्रीं च्या उत्सवमूर्तीसमोर असलेल्या चांदीच्या मूर्तीवर सूर्यकिरणे पडली होती. त्यासोबतच देवी सिद्धी व देवी बुद्धी यांच्या मूर्तींना देखील सूर्यकिरणे स्नान घालत असल्याचा भास होत होता.

काय म्हणाले कोषाध्यक्ष

ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले की, माघ गणेशजन्माच्या पार्श्वभूमीवर उत्तरायणामध्ये हा सोहळा अनुभवायला मिळतो. गेले तीन दिवस दररोज सकाळी सूर्यकिरणे श्रीं च्या मूर्तीवर पडत आहेत. दगडूशेठ गणपती मंदिर हे पूर्वाभिमुख असल्याने ही किरणे मूर्तीवर पडतात. मंदिराची रचना पूर्वाभिमुख व उंच असल्याने गाभा-यात सूर्यकिरणांचा यावेळी प्रवेश होतो. त्यामुळे भाविकांना हा सोहळा अनुभवता आला. (kiranotsav ceremony in dagadusheth halwai mandir)

 

इतर बातम्या

अविनाश भोसलेंचा मुलगा ईडीच्या ताब्यात, अमित भोसलेंना पुण्यावरुन मुंबईत आणलं

फेक कंटेट वापरला जातोय, तुमच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह, केंद्रानं ट्विटरला फटकारलं