पुणे: भाजप नेते किरीट सोमय्या पुणे दौऱ्यावर आहेत.बजरंग खरमाटे यांच्या संपत्तीची पाहणी केल्यानंतर पुण्यात पत्रकार परिषद घेतली आहे. किरीट सोमय्या यांनी आजच्या पत्रकार परिषेदत शरद पवार आणि अजित पवारांवर निशाणा साधला. पत्रकार परिषद अजित पवार पासून सुरु करायची की शरद पवारांपासून सुरु करायची या संभ्रमात आहे, असं सोमय्या म्हणाले. अजित पवारांमध्ये हिम्मत आहे तर जरंडेश्वर कारखान्याच्या व्हॅल्यूएशनचे कागद का लोकांसमोर ठेवत नाहीत, असा सवाल सोमय्यांनी केला आहे. 65 कोटीत कारखाना घेतला अन 700 कोटीच बँकेचे कर्ज घेतले, असं सोमय्या म्हणाले. सातशे कोटींचं कर्ज घ्यायचं असेल तर त्या कारखान्याचं व्हॅल्युएशन 1 हजार कोटी असलं पाहिजे. जरंडेश्वरच्या एका व्हॅल्यूअरचं नाव वैभव शिंदे आहे, असंही ते म्हणाले. 65 कोटीच्या व्हॅल्यूएशनवर 700 कोटींचं कर्ज काढलं?, शरद पवार साहेब यासाठी तुम्हाला सहकार चळवळ हवीय का? असा सवाल सोमय्यांनी केला.
किरीट सोमय्यांनी आज अजित पवार यांच्यामध्ये हिम्मत असेल तर जरंडेश्वर कारखान्याच्या व्हॅल्यूएशनचे कागद का लोकांसमोर ठेवत नाहीत, असा सवाल सोमय्यांनी केला आहे. 65 कोटीत कारखाना घेतला अन 700 कोटीच बँकेचे कर्ज घेतले, असं सोमय्या म्हणाले. जरंडेश्वरच्या एका व्हॅल्यूअरचं नाव वैभव शिंदे आहे, असंही ते म्हणाले.
जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना हा प्रथम मेसर्स गुरू कमोडीटी प्रा ली कंपनीने विकत घेतला होता.मात्र, ही गुरू कमोडिटी कंपनी बनावट असल्याचा ईडीच्या अधिकाऱ्यांना संशय आहे.जरंडेश्वर शुगर मिल प्रा ली ने पुणे जिल्हा कॉ ऑप बँकेकडून सुमारे 700 कोटी रुपये कर्ज घेतलं आहे. गुरु कमोडिटीजनं 2010 सालात 65 कोटी 75 लाख रुपयांना खरेदी केला होता.हा कारखाना सध्या मेसर्स गुरू कमोडिटी सर्विसेस प्रा. ली यांच्या मालकीचा आहे.हा कारखाना मेसर्स जरेंडेश्वर शुगर मिल प्रा लिमिटेडला भाड्याने देण्यात आला आहे. मेसर्स जरडेश्वर प्रा लिमिटेड कंपनीत मेसर्स सपार्किंग सोईल प्रा लिमिटेड कंपनी ही भागीदार कंपनी आहे. ईडीने केलेल्या तपासात मेसर्स स्पार्कलिंग कंपनी ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित आहे.
214 एकर परिसरातील कारखाना केवळ 40 कोटी रुपयात विकायला काढला. अजित पवारांच्या म्हणण्यानुसार हायकोर्टाच्या आदेशाने या कारखान्याचा लिलाव करण्यात आला. लिलाव सुरु झाला त्यावेळी पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये जवळपास दहापेक्षा अधिक कारखाने, कंपन्यांनी उत्सुकता दाखवून निविदा भरल्या. 40 कोटीपर्यंत या कंपन्यांनी बोली लावली. मात्र अचानक एका कंपनीने एण्ट्री घेतली आणि थेट 65 कोटीची बोली लावून जरंडेश्वरचा ताबा घेतला. ही कंपनी म्हणजे गुरु कमॉडिटीज होयं.
शरद पवार सर्टिफिकेट देतात ईडी अतिक्रमण करते, हैराण करते, भावना गवळी निर्दोष आहे. भावना गवळीने 40 वेळा बँकेतून पैसे काढले आहेत. 21 लाखांपेक्षा कमी पैसे काढले नाहीत. रिसोर्स अर्बन क्रेडिट सोसायटीमधून हे पैसे काढले आहेत. अन शरद पवार म्हणतात ईडी का चौकशी करते. शरद पवार आपणच ठाकरे सरकारला मार्गदर्शन करताय का? एकूण 118 कोटींचा घोटाळा आहे. शरद पवारांना भावना गवळींना वाचवायचे असेल तर त्यांनी सांगावं, असं किरीट सोमय्या म्हणाले. तर, शरद पवारांना यासाठी सहकार चळवळ हवी आहे का, असा सवाल सोमय्या यांनी शदर पवारांना केला.
इतर बातम्या:
काय आहे जरंडेश्वर कारखाना प्रकरण, अजित पवारांचा नेमका संबंध काय?
जरंडेश्वर साखर कारखाना ईडीकडून सील, ED ची कारवाई नेमकी कुणावर? अजित पवारांनी काय सांगितलं?
जरंडेश्वर प्रकरण A टू Z, अजित पवार ED च्या रडारवर का आहेत? सोपं कारण
Kirit Somaiya gave challenge to Ajit Pawar on Jarandeshwar Sugar Mill