पुणे: भाजप नेते किरीट सोमय्या पुणे दौऱ्यावर आहेत.बजरंग खरमाटे यांच्या संपत्तीची पाहणी केल्यानंतर पुण्यात पत्रकार परिषद घेतली आहे. किरीट सोमय्या यांनी यावेळी शरद पवार, अजित पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भावना गवळी, छगन भुजबळ अनिल परब यांना लक्ष्य केलं आहे. तर, पत्रकारांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर केलेल्या आरोपबद्दल काय भूमिका आहे, असं विचारलं असता राज्य सरकारनं त्याप्रश्नी कारवाई करावी, असं म्हणत किरीट सोमय्यांनी त्या प्रश्नाला बगल दिली. तर, छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन प्रकरणी दोषमुक्त करण्यात आल्याबद्दल विचारलं असता आगे आगे देखो होता है क्या, असं म्हणत सोमय्या यांनी इशारा दिला.
पत्रकार परिषद अजित पवार पासून सुरु करायची की शरद पवारांपासून सुरु करायची या संभ्रमात आहे, असं सोमय्या म्हणाले. पुढच्या आठवड्यात आणखी एक कॅबिनेट मंत्र्यांचे घोटाळे कागदपत्रासह लोकांसमोर आणणार असल्याचं त्यांनी सांगितलं. अजित पवारांमध्ये हिम्मत आहे तर जरंडेश्वर कारखान्याच्या व्हॅल्यूवेशनचे कागद का लोकांसमोर ठेवत नाहीत, असा सवाल सोमय्यांनी केला आहे. 65 कोटीत कारखाना घेतला अन 700 कोटीच बँकेचे कर्ज घेतले, असं सोमय्या म्हणाले. जरंडेश्वरच्या एका व्हॅल्यूअरचं नाव वैभव शिंदे आहे, असंही ते म्हणाले.
अनिल परब मंत्रिमंडळात कसे?
बजरंग खरमाटे आणि अनिल परब संदर्भातील एका याचिकेवर सुनावणी पुढच्या महिन्यात लोकायुक्त समोर आहे. दोन तीन आठवड्यात पहिली कारवाई होणार असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले.अनिल परब यांचं अनधिकृत रिसॉर्ट पाडण्याचा प्रस्ताव मंजूर झालाय, मग तरी अनिल परब मंत्रिमंडळात कसे काय? असा सवाल सोमय्या यांनी केला आहे.
शरद पवार सर्टिफिकेट देतात ईडी अतिक्रमण करते, हैराण करते, भावना गवळी निर्दोष आहे. भावना गवळीने 40 वेळा बँकेतून पैसे काढले आहेत. 21 लाखांपेक्षा कमी पैसे काढले नाहीत. रिसोर्स अर्बन क्रेडिट सोसायटीमधून हे पैसे काढले आहेत. अन शरद पवार म्हणतात ईडी का चौकशी करते. शरद पवार आपणच ठाकरे सरकारला मार्गदर्शन करताय का? एकूण 118 कोटींचा घोटाळा आहे. शरद पवारांना भावना गवळींना वाचवायचे असेल तर त्यांनी सांगावं, असं किरीट सोमय्या म्हणाले. तर, शरद पवारांना यासाठी सहकार चळवळ हवी आहे का, असा सवाल सोमय्या यांनी शदर पवारांना केला.
छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून दोषमुक्त केल्याबद्दल विचारलं असता किरीट सोमय्यांनी आगे आगे देखो होता है क्या, असं शायरीतूनचं उत्तर दिलं. कितीही अटॅक करा, मी महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त केल्याशिवाय राहणार नाही, असंही सोमय्या म्हणाले.
इतर बातम्या:
साज़िशें लाखो बनती है मेरी हस्ती मिटाने की, कोर्टाच्या निकालानंतर छगन भुजबळांचा शायराना अंदाज
जगातील सर्वांत उंच ‘भगवा ध्वज’ उभारण्याचा रोहित पवार यांचा संकल्प, मुहूर्तही ठरला!
Kirit Somaiya slams MVA leaders including Uddhav Thackeray Sharad Pawar Ajit Pawar Anil parab and Chhagan Bhujbal