कोल्हापूर: रंगपंचमीच्या आनंदावर विरजण टाकणाऱ्या दोन धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यात घडल्या आहेत. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनांमुळे कोल्हापूरमध्ये खळबळ माजली आहे. रंगपंचमी खेळून मुलं पोहण्यासाठी गेली असता पाण्यात बुडाल्यानं हा प्रकार घडला आहे. (Kolhpaur three boys died due to drown in water after celebration of Rang Panchami)
कोल्हापूर जिल्ह्यातीतल पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे रंगपंचमी खेळून पोहायला गेलेल्या दोघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोडोली येथे शुभम पाथरवट(Shubham Patharvat) आणि शिवराज साळुंखे (Shivraj Salunkhe)या दोघांचा मृत्यू झाला. दोघांच्या मृत्युमुळे कोडोली गावावर शोककळा पसरली आहे. शुभम पाथरवट आणि शिवराज साळुंखेंच्या मृत्युमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
कोल्हापुरात शिंगणापूर येथेही अशीच घटना घडली.यशराज माळी या मुलाचा खाणीत बुडून मृत्यू झाला. बचाव पथकाला एका मुलाचा जीव वाचवण्यात यश आलं आहे. जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन पथकानं त्या मुलाचा जीव वाचवला.
उन्हाळा आल्यानंतर ग्रामीण भागात मुलं पोहायला जातात. यामध्ये काहीवेळा ज्यांना पोहायाला येत नाही ती मुलं देखील पोहायला जातात. पोहायला येत नसतानाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना दरवर्षी समोर येतात. मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू होऊ नये यासाठी पालकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
बीडमध्ये सेल्फी घेताना धरणात बुडून दोघांचा मृत्यू
सेल्फी घेण्याच्या नादात आतापर्यंत अनेकांनी जीव गमावल्याच्या घटना घडत असतात. मागील आठवड्यात बीड जिल्ह्यात सेल्फी काढण्याच्या नादात धरणात पडून दोन संख्या भावांचा मृत्यू झाला होता. मालेगाव तालुक्यातील विराने शिवारात ही घटना घडली होती. हर्षल जाधव (22) , रितेश जाधव (18) असे बुडून मृत्यू झालेल्या भावांची नाव आहेत. विराने तलावाच्या काठावर ते सेल्फी काढत होते.
‘कोणी तरी रक्ताअभावी तडफडून मरतोय, हे महाराष्ट्राला भूषणावह नाही’, जितेंद्र आव्हाड यांचं रक्तदान आवाहनhttps://t.co/rJfwGs4hMR #JitendraAwhad #BloodDonation #Maharashtra
@Awhadspeaks @NCPspeaks— TV9 Marathi (@TV9Marathi) April 2, 2021
संबंधित बातम्या
Gold Rate Today: शेअर बाजारातील घसरणीनंतर सोने-चांदी महागले; 10 ग्रॅम सोन्याचा भाव काय?
पनवेलमध्ये दुहेरी हत्याकांड, लग्नास नकार दिल्यानं मुलीसह आईची हत्या
(Kolhpaur three boys died due to drown in water after celebration of Rang Panchami)