पुणे : ऊस शेतीच्या थंडगार वातावरणात बिबट्याचे (leopard) वास्तव्य अनेकवेळा आढळून आलं आहे. मात्र बिबट्याची रुबाबदार चाल आणि शिकारीसाठी लावलेली नजर यावेळी काही तरुणांनी कॅमेरात कैद केली आहे. बिबट्या ऊस शेतीच्या (Sugarcane farming) बांधावरुन जात असताना काही तरुण कारमधून निघाले होते. त्यावेळी झालेला सगळा प्रकार तरुणांनी मोबाईलमध्ये शूट केला आहे. विशेष म्हणजे बिबट्या रस्त्याच्या शेजारी असलेल्या उसाच्या बांधावर बिनधास्त उभा आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील जुन्नर (pune junnar) तालुक्यातील बोरी बुद्रुक येथील शेत शिवारातील आहे.
बिबट्याचं वास्तव शक्यतो उसाच्या रानात असतं असं अनेकदा दिसून आलं आहे. कारण उसाच्या शेतात बिबट्या शक्यतो दिसून येत नाही. त्याचबरोबर त्याला तात्काळ लपता येतं. पण पुण्यातील जुन्नर तालुक्यातील बिबट्या उसाच्या बांधावरून शिकारीसाठी फिरत आहे. त्याचवेळी तिथून एक कार निघाली आहे. त्या कारमधील तरुणांना तो बिबट्या दिसतो.
कार जाग्यावर थांबवल्यानंतर बिबट्या त्या कारकडे पाहत आहे. त्यावेळी ते तरुण बिबट्याला मोबाईलमध्ये कैद करीत आहे. हा प्रसंग काही सेकंदाचा आहे. परंतु या व्हिडीओमुळे अनेकांना घाम फुटला असेल एवढं मात्र नक्की.