पुणे – गावातील यात्रा कमिटीच्या बैठकीत (Village Yatra Committee meetings) गावातील अवैध दारूविक्री बंद (Stop selling illegal liquor) करण्याचे ठरले होते. त्याला न जुमानता दारूविक्री करणाऱ्या दारू विक्रेतेचा, यात्रेदरम्यान ग्रामस्थांनी गांधीगिरीने (gandhigiri) पध्दतीने सत्कार केला. त्याचबरोबर अवैध धंदा बंद करण्याची त्याला शपथ दिली. गांधीगिरीने त्याचा सन्मान करून दारू विक्री बंद करण्यासाठी विक्रेत्याला भाग पाडल्याने संपुर्ण परिसरात त्याची काल दिवसभर चर्चा होती, मारुती कचरे असं त्या दारु विक्रेत्याचं नाव असल्याची माहिती समजली आहे. विशेष म्हणजे गावातील कुरुंजाई देवीच्या यात्रेदरम्यान हा प्रकार घडला आहे. त्यामुळे संपुर्ण गावात सकारात्मक वातावरण होते.
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील कुरुंजी गावात हे सगळं गावातील ग्रामस्थांनी घडवून आणलं. यापुर्वी असं सगळं काही करायचं असं नियोजन कमिटीने ठरवलं असल्याची सुध्दा माहिती मिळाली आहे. त्यामुळे सगळे ग्रामस्थ तयारीनिशी होते. गावातील दारुविक्री बंद झाल्याने संपुर्ण गावात आनंदाचं वातावरण आहे.
गावात अवैध पध्दतीने दारु विक्री होत असल्यामुळे अनेक वादविवाद होत होते. ग्रामस्थांनी कंठाळून दारु विक्रेत्याला याबाबत एकदा समज सुध्दा दिली होती. त्यानंतरही दारुविक्री होत असल्यामुळे ग्रामस्थांनी गांधीगिरी पध्दतीची मार्ग अवलंबला आणि गावातील अवैध दारु विक्री कायमची बंद केली.