पुणे : मनसेचा पुण्यातील अक्षय्य तृतीयेला (Akshaya tritiya) आयोजित करण्यात आलेल्या महाआरती करण्याचा निर्णय स्थगित झाला आहे. मनसेचे राज्य प्रवक्ते योगेश खैरे (Yogesh Khaire) यांनी याविषयीची माहिती दिली आहे. मनसे आणि हिंदुत्त्ववादी संघटनांच्या वतीने पुण्यात प्रत्येक शाखेत महाआरती (Maha aarti) करण्यात येणार होती. उद्या रमजान ईद आहे. त्यापार्श्वभूमीवर हा निर्णय सध्यातरी स्थगित करण्यात आला आहे. मशिदींवरचे भोंगे काढण्यासाठी मनसे अधअयक्ष राज ठाकरे यांनी तीन मेचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्याचेही आव्हान दिले होते. तर तीन तारखेला मनसेतर्फे महाआरती आयोजित करण्यात आली होती. मात्र आत्ता मिळालेल्या माहितीनुसार या महाआरतीचा कार्यक्रम सध्यातरी स्थगित करण्यात आला आहे. मनसेच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे समजते.
राज ठाकरेंच्या आदेशानुसार 3 तारखेला ईद असल्याने हनुमान चालिसा लावली जाणार नाही. मनसे पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. ईदचा सण पार पडू देणार. त्यानंतर मशिदींवरील भोंगे सुरू राहिल्यास मात्र 4 तारखेनंतर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावली जाणार, अशी माहिती मनसेचे राज्य प्रवक्ते योगेश खैरे यांनी दिली आहे.
उद्या म्हणजेच 3 मे रोजी मनसेकडून राज्यभर महाआरती आणि हनुमान चालिसा करण्यात येणार होती. 3 मे रोजी ईद असली तरी त्याच दिवशी अक्षय तृत्तीयाही आहे. त्यामुळे त्या दिवशी राज्यात महाआरती आणि हनुमान चालिसाचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शिवतीर्थावर मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला होता. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी याविषयी माहिती दिली होती.
या संदर्भात सरकारची बैठक सुरू आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील काही निर्णय घेतील. त्यामुळे सरकारच्या गाईडलाईन येत नाही तोपर्यंत भाष्य करता येणार नाही. गाइडलाइन आल्यावरच विचार विनियम करू, असे बाळा नांदगावकर यांनी सांगितले होते.