पुणे : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कोठेवाडी येथील दरोडा व बलात्कार प्रकरणातील 12 आरोपींची मोक्का अर्थात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यातून सुटका करण्यात येत असल्याचा निकाल औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. संदर्भित विषयावर गावातील ग्रामस्थांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. भेटीत तेथील माता भगिनींनी शस्त्र परवाना मिळावा, अशी मागणी केली. ही मागणी तात्काळ मान्य करत गृहमंत्र्यांनी कोठेवाडी ग्रामस्थांना योग्य त्या नियमांनुसार शस्त्र परवाने द्या, अशा सूचना संबंधित प्रशासनाला दिल्या आहेत. या बैठकीवेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे, नगरचे पोलीस निरीक्षक मनोज पाटील, डी. वाय. एस. पी. सुदर्शन मुंडे उपस्थित होते. (Maha Gov unique gift of Rakshabandhan to Kothewadi women, decision to issue arms license to villagers)
ग्रामस्थांसमावेत झालेल्या या बैठकीत डॉ. नीलम गोर्हे यांनी काही महत्त्वाच्या मागण्या केल्या, त्यामध्ये प्रामुख्याने गावात संरक्षण वाढवावे, गावात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर नजर असावी, यासाठी सीसीटीव्ही दुरूस्त करून द्यावेत, ग्राम रक्षक दलामार्फत समन्वय करून द्यावे, जेणेकरून काही अडचणी असतील तर पोलीस आणि सरकारची सहाय्यता त्यांना मिळू शकेल. या बैठकीत महिला अत्याचाराच्या प्रश्नावर भगिनींना शस्त्र परवाना मिळावा, या मागणीनंतर परवाना देण्याचा एतिहासिक निर्णय गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतला आहे. ही रक्षाबंधनापूर्वी अनोखी भेट शासनाने दिली त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचेही त्यांनी आभार मानले.
… तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस ओबीसींना 30 टक्के जागा देणार; नाना पटोले यांची मोठी घोषणाhttps://t.co/k6RX97qF6q#nanapatole | #bjp | #maharashtra | #congress | #OBCreservation
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 7, 2021
इतर बातम्या
तेजस ठाकरे माझ्या डोक्याबाहेरचा विषय, जीवसृष्टी सोडून राजकारणात येईल असं वाटत नाही: भुजबळ
(Maha Gov unique gift of Rakshabandhan to Kothewadi women, decision to issue arms license to villagers)