विधानसभा निवडणुकीची रणसंग्राम सुरू आहे. दिवाळीतही नेते मंडळी गावागावात जाऊन सणाच्या निमित्ताने मतदारांशी हितगुज साधत आहेत. मतदारांना निवडणुकीत त्यांच्या पक्षाला मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीने अजून सभांचा धडाका लावला नसला तरी त्यांनी वैयक्तिक भेटी-गाठी आणि जनसंपर्कावर सध्या जोर दिला आहे. अजितदादांनी पण त्यांच्या मतदार संघातील जनतेशी संवाद साधला आहे. अनेक गावात दादांचा मोठा चाहता वर्ग दिसून येतो. यावेळी दादांच्या रोखठोक स्वभावाचे पुन्हा सर्वांना दर्शन झाले. दादांनी त्यांना असे आश्वासन दिले.
आज मी माझ्या कामासाठी आलोय
तुम्ही जसं घर चालवता तस आम्ही राज्याचा कारभार करतो म्हणजे १३ कोटी जनतेचा प्रपंच चालवतो. एक जण म्हणाला दादा अधिकाऱ्यांना सांगून पण काम होत नाही. यावेळी दादा म्हटले तू मला २३ तारखेनंतर भेट काहीनान वाटायच दाद भेटतो की नाही मी सारखं भेटत असतो. आज मी माझ्या कामाकरिता आलो आहे. तुमच्या कामाकरिता नाही. हात जोडून विनंती करायला आलो आहे. मला पाच वर्षाकरिता निवडून द्या. काम करण्याची माझ्यात धमक आहे. प्रशासनावर माझी पकड आहे हे तुम्ही पाहिलेलं आहे. लोकसभेला काय झालं हे मला काढायच नाही. खोट्या बातमी पसरवल्याजातील त्यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन त्यांनी यावेळी मतदारांना केले.
या तालुक्यासाठी निधी खेचून आणणार
माझ्या वतीने कोणी ना कोणी भेटायला येईल. नंबर एक चा तालुका राहिलेला आहे आपला तालुका देशात पहिल्या क्रमांकाचा विकासाकरिता राहिला आहे. जेवढा जास्त मतांनी निवडून द्याल तेवढा जास्त निधी देणार, असे आश्वासन त्यांनी जनतेला दिले. यावेळी मतदारांच्या समस्या, त्यांच्या तक्रारी त्यांनी ऐकून घेतल्या.
आरक्षणावर बाबत काय म्हणाले?
आर्थिक परिस्थिती पाहून आरक्षण मिळालं पाहिजे. मधल्या काळात १० टक्के आरक्षण केलं. आरक्षण टिकावे म्हणून यासाठी खबरदारी घेतलेलं आहे.ओबीसी मध्येच पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. ओबीसी म्हणतात की ३५० जाती आहेत त्यात कुणबी पण म्हणतात. हा प्रश्न मराठवाड्यात गंभीर झालेला आहे. निजामशाही होती त्यांच्र नियम वेगळे होते. जरांगे पाटील म्हणतात की १० टक्के नको ओबीसी त पाहिजे. ओबीसी म्हणतात की संख्या जास्त असून पण लाभ मिळत नाही, असे अजितदादा म्हणाले.
जात निहाय जनगणना झाली पाहिजे
जात निहाय जनगणना झाली पाहिजे. जात निहाय गणना झाल्या शिवाय काळणार नाही. जनगणना होणारच आहे. त्यात कोणता वर्ग किती आहे हे समोर येईल. त्या प्रमाणात आरक्षण आहे का हे पाहायला सोप जाईल. महायुतीच्या वतीने सांगेन की आरक्षण देण्याच्या बाजूचे आहोत. जे मागणी करतात त्यांना मान्य नाही. सरसकट कुणबी त्यात मी पण आलो. जातनिहाय जनगणना झाल्याशिवाय कोणाचं वर्ग किती हे कळणार नाही. आरक्षणावर अजित पवारांचं वक्तव्य समोर आलं.
लाडकी बहीण योजना सुरू राहणार
उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये होतो आता महायुती मध्ये आहे. सरकारमध्ये आपल्याला झुकत माप देण्याचा प्रयत्न केला. संस्था आपण चांगल्या चालवतोय काही अडचणीत असेल ते त्याला बाहेर काढतो. लाडकी बहीण योजना पॉपुलर झाली आहे. आम्ही छातीठोकपणे सांगतो की महायुती सरकार आल्यावर आम्ही योजना सुरु ठेवू, असे आश्वासन त्यांनी दिले. मी तुमच्यामुळे निवडून आलो तिथे गेलो म्हणून काम करू शकलो. लोकसभेला जे घडलं त्या बद्दल मी काही बोलणार नाही, असे ते म्हणाले.