पुणे: कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने निर्बंध घातले आहेत. त्या अनुषंगाने शासनाने राज्यातील रिक्षा परवाना धारकांना प्रत्येकी 1500 रूपये प्रमाणे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. बारामतीत रिक्षा परवाना धारकांच्या खात्यावर अनुदानाची पंधराशे रुपये रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.त्यामुळे लॉकडाऊनमध्ये थोडा का होईना रिक्षा चालकांना आर्थिक आधार मिळाला आहे. (Maharashtra Government started transfer 1500 rs to permit holder licenced auto drivers)
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती कार्यालयातील संगणकीय अभिलेखानुसार वाहन 4.0 या प्रणालीवर जवळपास 1829 नोंदणीकृत रिक्षा परवानाधारक आहेत.मात्र 1829 पैकी फक्त 751 रिक्षा परवानाधारकांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत.त्यातील 506 ऑनलाइन अर्जाना मंजुरी देण्यात आली असून उर्वरित 141 अर्जाची छाननी सध्या सुरू आहे
रिक्षा चालकांच्या बँक खात्यावर ऑनलाईन पध्दतीने रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात पंधराशे रुपये ची अनुदान हे रिक्षा परवाना धारकांना मिळाल्याने थोडा का होईना आर्थिक हातभार मिळाला आहे.
परवानाधारक रिक्षाचालकांना एकवेळचे अर्थसहाय्य म्हणून 1 हजार 500 रुपये एवढे अर्थ सहाय्य देण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्यात आला आहे. रिक्षा चालकांना कोणतेही कागदपत्र सादर न करता केवळ ऑनलाईन प्रणालीवर त्यांचा वाहन क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक आणि आधार क्रमांक नोंद करावा लागणार आहे. सदर माहिती संगणक प्रणालीवर प्रमाणित करण्यात येईल. परवानाधारक रिक्षा चालकांनी https://transport.maharashtra.gov.in/1133/Autorickshaw-Financial-Assistance-Scheme या वेबसाईटवर जाऊन अर्ज सादर करावेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ब्रेक द चेन निर्बंध लावताना समाजातील काही घटकांना मदत देण्याची घोषणा केली. त्यामध्ये परवानाधारक रिक्षा चालकांचा समावेश करणात आला होता. त्यानुसार आता परवानाधारक रिक्षाचालकांना एकवेळचे अर्थसहाय्य म्हणून 1 हजार 500 रुपये अर्थ सहाय्य केलं जात आहे. राज्य सरकार 7. 15 लाख रिक्षा चालकांना 1500 रुपये देणार आहे.
Breaking : सह्याद्री अतिथीगृहातील मोठा स्लॅब कोसळला, मंत्री आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले https://t.co/v7AITYa7ro @OfficeofUT @AUThackeray @ShivSena @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra #SahyadriGuestHouse #SlabCollapse #AdityaThackeray #UddhavThackeray #ShivSena
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 4, 2021
संबंधित बातम्या:
भाजप नेता म्हणतो, मुंबईत ऑटो, टॅक्सीचं भाडं वाढवा, नाही तर मातोश्रीसमोर चक्का जाम
(Maharashtra Government started transfer 1500 rs to permit holder licenced auto drivers)