बारामती : केंद्र सरकारकडून महाराष्ट्रावर अन्याय झाल्याची धक्कादायक बाब उघड झालीये (Maharashtra Has Not Had A Single PPE Kit Since September). केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्यापासून महाराष्ट्राला एकही पीपीई किट दिलेली नाही, ही धक्कादायक माहिती आता पुढे आली आहे. तसेच, इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला कोरोना निर्मुलनासाठी अत्यल्प निधी दिल्याचं समोर आलंय (Maharashtra Has Not Had A Single PPE Kit Since September).
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी ही बाब उघडकीस आणलीय.
महाराष्ट्र सरकार कोव्हिडच्या विरोधात संपूर्ण ताकदीने लढत असताना केंद्र सरकारनेही राज्याला याकामी मदत करावी, यासाठी राज्य सरकारने बऱ्याच वेळा मदतीसाठी पत्रव्यवहार करुनही अन्य राज्यांच्या मानाने खुप तुटपुंजी मदत केंद्राने महाराष्ट्रास केली असल्याची बाब माहिती अधिकारातून प्राप्त झालीये.
राज्यात भाजपविरोधी सरकार आहे म्हणून केंद्र सरकारने यात हात आखडता घेतला की काय असा प्रश्न पडत असल्याचं माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे अन्य सरकारला केंद्र सरकार भरभरुन मदत करत असताना महाराष्ट्राला सप्टेंबर 2020 ते आजअखेर एकाही पीपीई किटचा पुरवठा केंद्र सरकारने राज्यास केला नसल्याची धक्कादायक बाब यातून उघडकीस आली आहे (Maharashtra Has Not Had A Single PPE Kit Since September).
मागणीच्या 10 टक्के पुरवठाही केंद्र सरकारने कोव्हिडच्या महामारीत जाणूनबुजून तर केला नाही ना, असा प्रश्न आता यानिमित्ताने पडत असल्याचे यादव यांनी सांगितलं.
>> बारामतीत दिवसभरातील पॉझिटीव्ह रुग्ण 43
>> शहर – 25
>> ग्रामीण – 18
>> बारामतीतील एकूण रुग्णसंख्या – 6937
>> बारामतीतील एकूण बरे झालेले रुग्ण- 6433
>> बारामतीतील एकूण मृत्यू- 146
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी घेतली कोरोना लस, मुंबईत लॉकडाऊनची गरज नसल्याचं स्पष्टीकरणhttps://t.co/XoN0lX3HOC#mumbai | #corona | #lockdown | #kishoripednekar | #lockdown | @mybmc | @KishoriPednekar
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 4, 2021
Maharashtra Has Not Had A Single PPE Kit Since September
संबंधित बातम्या :