पुणे: महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातील गट क आणि गट ड संवर्गातील पदांच्या भरती प्रक्रियेतील गोंधळ अद्याप सुरुच आहे. आरोग्य विभागाची परीक्षा आयोजित करण्याची जबाबदारी असलेल्या न्यासा कंपनीच्या गोंधळामुळे यापूर्वी परीक्षा रद्द करण्याची नामुष्की ओढावली होती. आता, गट क आणि गट ड पदाच्या परीक्षेसाठी 24 आणि 31 ऑक्टोबरला परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. मात्र, यामधील देखील गोंधळ संपत नसल्याचं समोर आलं आहे. उमेदवारांनी वेगवेगळ्या संवर्गातील अर्ज भरल्यामुळं वेगवेगळ्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्र मिळाल्याचं समोर आलं आहे.
24 आणि 31 तारखेला आरोग्य विभागाची गट क आणि गट ड ची परीक्षा होणार आहे. मात्र, आरोग्य विभागाच्या वेगवेगळ्या संवर्गातील अर्ज उमेदवारांनी भरले आहेत. मात्र, सगळ्या संवर्गाची परीक्षा एकाच दिवशी आल्यानं दोन परीक्षांचे अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांला एका परीक्षेला मुकावं लागणार आहे. जिल्हा बदलून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र मिळाल्याचंही समोर आलं आहे. तर, प्रवेशपत्रावरील पिनकोडही चुकीचं आल्याची विद्यार्थ्यांची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. यापूर्वी तांत्रिक गोंधळामुळे आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलली होती. यावरुन विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली होती.
आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलल्यानंतर राज्यातील विद्यार्थ्यांनी मनस्ताप व्यक्त केला होता. 24 ऑक्टोबर गट क ची परीक्षा तर गट ड साठी 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा घेण्याचा निर्णय झाल्याची माहिती माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. या दोन्ही दिवशी रविवार असल्यानं शाळा उपलब्ध होतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली होती. राजेश टोपे यांनी यावेळी 9 दिवस आधी हॉलतिकीट दिले जाईल, अशी देखील माहिती दिली. विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नका कुठलेही चुकीचे काम होऊ देणार नाही, असं म्हटलं होतं.
दरम्यान, आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील 2739 आणि गट ड संवर्गातील 3466 अशा एकूण 6205 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी राज्यातील 1500 केंद्रावर एकाच वेळी परीक्षा घेतली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया शासनाने निवडलेल्या खासगी बाह्य स्त्रोतांमार्फत केली जात आहे. उत्तर पत्रिकांची तपासणी संगणक प्रणालीद्वारे केली जाणार आहे.
इतर बातम्या
उद्धव ठाकरेंच्या 1 तासाच्या भाषणाची फडणवीसांकडून 17 मिनिटांत चिरफाड, हल्ले, टोले आणि सल्ले!
Maharashtra Health Department recruitment 2021 exam mistakes continue on Admit Card giving different address to candidates