पुणे : यंदा सगळीकडे चांगला पाऊस झालाय. त्यामुळे अनेक ठिकाणी साठलेल्या डासांची संख्या वाढताना दिसत आहे. राजधानी मुंबईसह पुणे आणि कोल्हापुरातही डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होतेय. तसंच कोल्हापुरात स्वाइन फ्लूनच्या (Swine Flu) रुग्णांमध्येही वाढ होत आहे. पुणे (Pune) शहरात वाढत डेंग्यूचे (Dengue) रुग्ण आहेत. शहरात यावर्षी आतापर्यंतचे डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्यातही नगर रस्ता, औंध-बाणेर, हडपसर आणि सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या भागात मोठ्या संख्येने रुग्णांचे निदान झालेय. या चार क्षेत्रीय कार्यालयांतून शहरातील 58 टक्के रुग्णांची आरोग्य विभागात नोंद करण्यात आली आहे. शहरातील 16 क्षेत्रिय कार्यालयांमध्ये गेल्या 26 दिवसांमध्ये 52 डेंगीच्या रुग्णांचे निदान झाले आहे. पुणे शहरात 1 जानेवारी ते 25 जुलै या सात महिन्यात आतापर्यंत डेंग्यूचे निश्चित निदान झालेल्या 195 रुग्णांची नोंद झाली आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. तर कोल्हापुरातही (Kolhapur) स्वाइन फ्लू रुग्ण वाढत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झालेला असतानाच डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आणि आता डेंग्यूनंतर आता स्वाइन फ्लून ही डोकं वर काढलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत स्वाइन फ्लूचे चार बळी गेले आहेत. तर 33 जणांना लागण झाली आहे. 20 जणांवर रुग्णालयात सुरू उपचार आहेत. बाधितांमध्ये 51 ते 60 वयोगटातील रुग्णांची संख्या अधिक आहे. शहर परिसरासह करवीर तालुक्यात स्वाइन फ्लूचा वेगाने फैलाव होतोय. दुखणं अंगावर काढू नका, लक्षणं आढळ्यास तात्काळ हॉस्पिटलमध्ये जा, असं आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आलं आहे.
गेल्या आठवडाभरात मुंबईत मलेरियाचे 154, डेंग्यूचे 17, लेप्टो 23, स्वाइन फ्लूचे 51 आणि गॅस्ट्रोचे तब्बल 184 रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी रुग्णांची आकडेवारी काळजी घ्यावी, असं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे.पावसामुळे पाणी साचून राहत डेंग्यू 524, दूषित पाण्यामुळे साथीचे आजार हिपेटायटीस 55 तर वाढत असल्याचे आरोग्य विभागाचे चिकनगुनियाचा 1 रुग्ण आढळला आहे. मुंबईत जुलैपासून जोरदार बरसणाऱ्या पावसामुळे कीटकांचा प्रभाव वाढला. त्यामुळे गॅस्ट्रोचे रुग्ण वाढत असल्याचं सांगण्यात येतं. यामध्ये दूषित पाण्यामुळे ‘एच 1 एन 1’ 62 गॅस्ट्रो, टायफॉइड, कॉलरा, कावीळ असे आजार होतात. तर कीटकांच्या प्रभावामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया असे आजार पसरत असल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं. वाढणारे पावसाळी आजार रोखण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. दीड हजार बेड तैनात ठेवण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.