Sharad Pawar | तुमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा कोण? शरद पवार यांनी कुणाचं नाव घेतलं?

| Updated on: Jul 02, 2023 | 8:16 PM

Maharashtra Politics Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आश्वासक चेहरा कोण? शरद पवार यांनी कुणाचं नाव घेतलं?

Sharad Pawar | तुमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा कोण? शरद पवार यांनी कुणाचं नाव घेतलं?
Follow us on

पुणे | राज्याच्या राजकारणात आज मोठी उलथापालथ झाली. राज्याचे विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार बंड करत राज्य सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार यांच्यासह मोठा गट राज्य सरकारमध्ये सामील झाला. ज्यांना राष्ट्रवादीचे निष्ठावंत आणि कट्टर कार्यकर्ते असं म्हटलं जायचं त्यांनीही पक्षाची साथ सोडली. दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे या आणि यासारख्या अनेक बड्या नेत्यांनी शरद पवार यांची साथ सोडत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला.

अजित पवारांच्या या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी वर्षभराआधी बंड पुकारलं होतं. शिंदेसह एक मोठा गट शिवसेनेतून बाहेर पडला होता. त्यानंतर शिंदेना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्हही मिळालं. त्यानंतर आता अजित पवारांनीही बंड केलं. अजित पवारांनी साडे 3 वर्षात तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 9 आमदारानी मंत्रिपदाची शपथ घेतली.

हे सुद्धा वाचा

राष्ट्रवादीत झालेल्या बंडानंतर सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. शरद पवारांनी या पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तर दिली. आपली भूमिका मांडली. “राज्य सरकारमध्ये सामील झालेले राष्ट्रवादीच्या आमदारांपैकी एकूण 80 टक्के आमदार हे स्वगृही परततील”, असा विश्वास शरद पवार यांनी बोलून दाखवला.

तसेच शरद पवार यांना या पत्रकार परिषदेत “तुमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा कोण?” करण्यात आला. या प्रश्नावर राष्ट्रवादी अध्यक्षांनी “शरद पवार” असं उत्तर दिलं. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. शरद पवार यांचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आमदार रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनीही हा व्हीडिओ ट्विट केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा आश्वासक चेहरा कोण?

दरम्यान शरद पवार हे उद्या सोमवारी 3 जुलै रोजी कऱ्हाडला माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे (प्रितीसंगम) दर्शन घेणार आहेत. त्यानंतर शरद पवार साताऱ्यात दलित समाजातील घटकांचा पहिल मेळावा घेणार आहे. तसेच भविष्यात राज्य आणि देशभरात जावून जनतेशी संपर्क वाढविण्याचा प्रयत्न करणार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं.

जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीचे मुख्य प्रतोद

अजित पवार विधानसभा विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा देत राज्य सरकारसोबत गेले. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार आणि शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू असलेल्या जितेंद्र आव्हाड यांची राज्याच्या विधानसभा विरोधीपक्ष नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच आव्हाड यांनाच राष्ट्रवादीच्या मुख्य प्रतोदपदाचीही जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता जितेंद्र आव्हाड कशाप्रकारे विरोधीपक्ष नेतेपदाची जबाबदारी पार पाडतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे.