पुणे : उखाणे स्पर्धेत विजयी झालेल्या महिलांना चक्क हेलिकॉप्टरची राईड मिळाली. पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यातर्फे आयोजित स्पर्धेत जिंकलेल्या 111 घरकामगार महिलांना हेलिकॉप्टरची सफर करण्याची संधी मिळाली. त्यामुळे या महिलांचा आनंद ‘गगनात’ मावेनासा झाला.
नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन उखाणे स्पर्धेत सहभागी झालेल्या 111 घरकामगार महिलांनी मोफत हेलिकॉप्टरची सफर केली. जनता वसाहत येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी अॅड. योगेश आढाव आणि निर्मल फाउंडेशन यांनी या उपक्रमाचे आयोजन केलं होतं.
नवरात्रौत्सवानिमित्त ऑनलाईन उखाणा स्पर्धा
नवरात्रौत्सवानिमित्त ही ऑनलाईन उखाणा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात उल्लेखनीय ठरलेल्या 111 महिलांना मोफत हेलिकॉप्टर राईड देणार असल्याचे आधीच जाहीर करण्यात आलं होतं. त्यानुसार नवरात्रौत्सवाची ऑनलाईन उखाणा स्पर्धा पार पडली आणि त्यात सहभागी झालेल्या 111 महिलांनी आज हेलिकॉप्टर सफर केली.
पाहा व्हिडीओ :
गणेशोत्सव मंडळाकडून हेलिकॉप्टरमधून पुणे दर्शन
दरम्यान, पुण्यात एका गणेश मंडळानेही याआधी गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेमध्ये विजयी होणाऱ्या महिलांना बक्षीसाच्या स्वरुपात थेट हेलिकॉप्टरमधून पुणे दर्शन घडवण्याचं गणेश मंडळाने जाहीर केलं होतं. पाच विजेत्या महिलांचे हे स्वप्न साकारही झालं होतं. विजेत्या महिलांना हेलिकॉप्टरमधून पुणे दर्शन घडवण्यात आलं होतं. हवेत उडण्याचा अनुभव अविस्मरणीय होता. हेलिकॉप्टरमध्ये बसून आम्हाला खूप आनंद झाला, अशी भावना या महिलांनी बोलून दाखवली होती.
संबंधित बातम्या :
नाद करा पण पुणेकरांचा कुठं?, स्पर्धा जिंकली म्हणून गणेश मंडळाकडून 5 महिलांना हेलिकॉप्टर राईड
चोरांचा फिल्मी स्टाईल पाठलाग, मुंबईत दरोड्याच्या तयारीतील चोरटे जेरबंद