पुणे- उद्या (दि. 26 फेब्रुवारी) रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (Maharashtra Public Service Commission) घेण्यात येणारी, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा(Exam ) होत आहे. या परीक्षेसाठीच्या सर्व केंद्रावर परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी दीड तास अगोदर उपस्थित राहणे आवश्यक आहे. उशिरा येणाऱ्या उमेदवारास प्रवेश दिला जाणार नसल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) स्पष्ट केले आहे. परीक्षा कक्षात प्रवेशासाठी आयोगाच्या ऑनलाइन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. ओळखीच्या पुराव्यासाठी आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड व स्मार्टकार्ड प्रकाराचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एक मूळ प्रमाणपत्र, त्याची छायांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे.
जा.क्र. 249/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 साठी उमेदवारांकरीता ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. pic.twitter.com/KXJjBTmzI1
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) February 24, 2022
कोरोना नियमाचे पालन बंधनकारक
परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांनी शक्यतो सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करावा. खासगी वाहनाच्या पार्किंगसाठी परीक्षा उपकेंद्रावर कोणतीही व्यवस्था करण्यात येणार नाही. परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश करताना मास्क बंधनकारक राहील. उमेदवारांनी स्वत:चे सॅनिटायझर वापरणे आवश्यक आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सूचनांचे आणि स्थानिक प्राधिकरणाकडून केलेल्या उपायायोजनांचे पालन करणे अनिवार्य आहे, असेही आयोगाने नमूद केले आहे.
मलिकांसाठी राष्ट्रवादी रस्त्यावर उतरली, केंद्र सरकारच्या कारवाया राजकीय सूडभावनेतून- जयंत पाटील