पुणे: महाराष्ट्रात महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर शिवभोजन थाळी देण्याचं जाहीर करण्यात आलं होतं. कोरोना काळात शिवभोजन थाळीची सुरुवातीची किंमत 10 रुपये ठेवण्यात आली होती. कोरोना काळात नंतर ती 5 रुपयांना देण्याची घोषणा करण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी लागू करताना शिवभोजन थाळी मोफत देण्याची घोषणा केली होती.(Maharashtra ShivBhojan Thali numbers increased check details of scheme)
महाराष्ट्रातील शिवभोजन केंद्रांची यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना प्रादुर्भवामुळे राज्य सरकारने कडक र्निबध लागू केले आहेत. अशा काळात कष्टकरी, मजूर,बेघर गरीब असणाऱ्या अनेकांसाठी राज्य सरकारची शिवभोजन थाळी मोठा आधार देत आहे. तर, राज्यात आजपासून प्रत्येक केंद्रावर 100 ऐवजी 150 जणांना थाळी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वांना ही थाळी मोफत दिली जातेय.पुण्यात खरंच शिवभोजन थाळी मोफत दिली जाते.
कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात, हातावर पोट असणाऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे शिवभोजन केंद्रावर दिवसेंदिवस गर्दी वाढू लागलीय. मात्र, दिवसाला 150 जणांना थाळीचा लाभ मिळत असल्याने अनेक जणांना उपाशी पोटी जावं लागतंय. त्यामुळे याची संख्या वाढवावी असं केंद्रचालक चंद्रशेखर यांनी सांगितलं.
पुणे जिल्ह्यात एकूण 96 ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरु आहेत. आजपासून दिवसाला 150 जण एका केंद्रावर शिवभोजन थाळीचा लाभ घेतात. पुणे जिल्ह्यात एकूण जवळपास 1400 हून अधिक जणांना थाळीच वाटप होते. शिवभोजन थाळीचा लाभ सध्या बेघर असलेले,गरीब,मजूर, कष्टकरी लोक घेतायत.
दोन पोळी, भात वरण एक भाजी
शिवभोजन केंद्रावर चांगल्या दर्जाचे जेवण दिलं जातं. दोन पोळी, भात वरण आणि एक भाजी असा मेनू आहे. कोरोना काळात शिवभोजन केंद्रावर लोकांचा प्रतिसाद प्रचंड मिळत आहे. कोरोनामुळे सध्या प्रत्येक केंद्रावर पार्सलची व्यवस्था करण्यात आली आहे. अवघ्या अर्धा ते पाऊणतासात केंद्रावरच्या थाळी संपतात.
नाशिकमध्ये शिवभोजन केंद्राला नागरिकांचा प्रतिसाद
दुपारपर्यंत ९८ हजार ९८५ थाळ्यांचे मोफत वितरण करण्यात आले आहे.संचारबंदीच्या काळात हाताला काम नसलेला एक मोठा वर्ग आहे अशा गरजू कुटुंबासाठी शिवभोजन थाळी उपयोगी पडत आहे.ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही, रोजच्या जेवणाची भ्रांत आहे. ज्यांच्या घरात चूल पेटत नाही, अशा निराश्रित,निराधार, pic.twitter.com/4SsJedQTHr
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) April 16, 2021
संबंधित बातम्या:
प्रजासत्ताक दिनी शिवभोजन थाळीचा शुभारंभ, कोणकोणत्या जिल्ह्यात शिवभोजन सुरु?
Photo : कोरोना संकटात शिवभोजन थाळीचा आधार; पाहा, नाशकातील हे फोटो