Ajit Pawar : मग बाकीच्यांनी काय गोट्या खेळायच्या? उमेदवारीवरून अजितदादांनी पेटवले रान, खेळले मोठे कार्ड

| Updated on: Nov 17, 2024 | 10:41 AM

Ajit Pawar Baramati Constituency : अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघात आक्रमक प्रचार केला. त्यांनी गावोगावी जाऊन भावनिक साद घातलीच पण पवार कुटुंबातील काहींवर निशाणा साधला. त्यात पुतण्या, काकू यांच्यावर निशाणा साधला. आता तर त्यांनी प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात मोठं कार्ड खेळलं आहे.

Ajit Pawar : मग बाकीच्यांनी काय गोट्या खेळायच्या? उमेदवारीवरून अजितदादांनी पेटवले रान, खेळले मोठे कार्ड
अजित पवार VS शरद पवार
Follow us on

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हे बारामतीचा गड जिंकण्यासाठी मैदानात उतरले आहेत. गावोगावी जात त्यांनी आपल्या तडाखेबंद भाषणांनी आणि रोखठोक स्वभावाने रंगत आणली. लोकसभेला पवार साहेबांना साथ दिली. आता मला विधानसभेत पाठवा असे आवाहन त्यांनी केले. गावोगावी जाऊन त्यांनी मतदारांना भावनिक साद घातलीच. पण त्याचवेळी अखरेच्या टप्प्यात त्यांनी युगेंद्र पवार आणि काकीवर पण निशाणा साधला. त्यांनी आता अजून एक मोठा पत्ता टाकला आहे. काही दिवसांपूर्वी रासपचे महादेव जानकर यांनी जाहीर सभेत जे वक्तव्य केले होते. तोच मुद्दा स्वत: अजितदादांनी हिरारीने मांडला आहे.

पवार कुटुंबियातच उमेदवारी का?

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांची चूल सध्या महायुतीच्या वाड्यात आहे. एक आठवड्यापूर्वी त्यांनी बारामती मतदारसंघातील काटेवाडी कण्हेरी येथे जोरदार भाषण केले. त्यात त्यांनी सत्ता केंद्र पवार कुटुंबियातच कसे असा सवाल केला होता. अजित पवार बाजूला झाल्यानंतर शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली. त्यावर त्यांनी शरद पवार यांनी पवार सोडून इतर कुणाला का उमेदवारी दिली नाही? असा सवाल केला होता.

हे सुद्धा वाचा

कुणाला साथ द्यायची हे तुम्ही ठरवा

माळेगांव मधील काही पुढारी चुकीचं काम करतायत मी तुम्हाला सांगतो तुम्हाला तसं करायच असेल तर उघड करा. पूर्वी आमदार झालो त्यावेळी याठिकाणी काय होत कुसलं यायची आता काय परिस्थिती आहे त्यामुळे तुम्ही विचार करून मला साथ द्या, असे आवाहन अजितदादांनी केले.

एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाचा माळेगांवच्या सभेला महिला आल्या आहेत. तुम्हाला पैसे देऊन आणलं का? कारण दोन दिवसापूर्वी पैसे देऊन सभेला आणलं गेलं. असं कधीच आजपर्यंत झालं नव्हतं मात्र ही पद्धत अतिशय चुकीची आहे, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.
मी उद्या सभा घेणार आहे. ते पण सभा घेणार आहेत ते त्यांचा विचार मांडतील मी माझा विचार मांडणार आहे पुढच्या पिढी साठी कुणाला साथ द्यायची हे ठरवा, असे आवाहन अजितदादांनी मतदारांना केले.

पवार साहेब रिटायर झाले. मग बारामतीकडे कोण लक्ष देऊ शकतो? साहेबाचा आदर राखून ताईंना साथ दिली. लोकसभेला साहेबांना साथ दिली. मी न मागता सगळं करतोय याची तुम्हाला किंमत कळत नाही मी कॅनॉल चे पाणी आणले नाहीत ऊसाची पाचट झाली असती विनंती करणे माझं काम आहे. मतदार म्हणून निर्णय तुमचा आहे, अशी भावनिक साद दादांनी घातली.

पवारांशिवाय दुसर्‍या कुणाला संधी आहे की नाही

दरम्यान नवीन नेतृत्व तयार करत असल्याच्या शरद पवार यांच्या वक्तव्यावर अजितदादांनी प्रतिक्रिया दिली. पवारांशिवाय दुसर्‍या कुणाला संधी आहे की नाही, असा सवाल त्यांनी केला. शरद पवार यांनी सांगीतलं की तीस वर्षांपासून अजितला संधी दिली. मग बारामतीत पवारांशिवाय दुसरं कोणी नाही का? आयुष्यभर पवारच उभे राहतील का? बाकीच्यांनी काय गोट्या खेळायच्या का? असे अजितदादा म्हणाले. यावरून अखेरच्या टप्प्यात अजितदादांनी मोठं कार्ड खेळल्याचं दिसून येते.