पुणे : खासदार मनेका गांधी यांनी पुण्यात श्वानांचा अनधिकृत सांभाळ आणि त्यांचे ब्रिडिंग करत त्यांना क्रूरतेने वागणूक दिल्याचा प्रकार उघडकीस आणला. त्यानंतर हा वाद न्यायालयात पोहचला. यावर सुनावणी करताना आता न्यायालयाने मूळ मालकाला या श्वानांचा ताबा देण्यास स्पष्ट नकार दिलाय. त्यामुळे या श्वानांना जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडे देण्यात येणार आहे (Maneka Gandhi complaint about Dog abuse in Pune administration take action).
न्यायालयात पिपल फॉर अॅनिमल्स यांच्यावतीने अॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी बाजू मांडली. पिपल फॉर अॅनिमल्सच्या संस्थापक आणि प्रमुख मेनका गांधी यांनी या प्रकरणी तक्रार केली होती. त्यानंतर पुणे जिल्हा अध्यक्षा पुनीत खन्ना व विनिता टंडन यांनी पोलिसांच्या मदतीने 12 श्वानांची लोणीकंद परिसरातून सुटका केली होती. मे महिन्यात पुनीत खन्ना यांनी हा सर्व प्रकार उघडकीस आणला होता. यावेळी खन्ना व टंडन यांना एका व्यक्तीच्या घरात हे 12 श्वान सापडले होते. ते जप्त करुन आता जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडे देण्यात येणार आहेत.