मुंबई : मान्सूनने भारताच्या वेशी प्रवेश केल्यानंतर आता त्याची वाटचाल महाराष्ट्राच्या दिशेनं सुरु झाली आहे. केरळमध्ये मान्सुन दाखल झाला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात मान्सुन दाखल होण्याची अनेक जण वाट पहायतायत. सध्या अरबी समुद्रात मान्सुन सक्रीय होण्यासाठी अनुकुल वातावरण आहे. त्यामुळे सध्या कोकणात मान्सूनच्या (Monsoon) आगमनाचे संकेत मिळतायत. या पार्श्वभूमीवर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील काही तासांत जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (heavy rains in Konkan, Central Maharashtra, Marathwada in next few hours)
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील काही तासांत जोरदार पावसाची शक्यता आहे. ठगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्याचबरोबर वादळी वारे वाहण्याचा अंदाजही वर्तवण्यात आलाय. तशी माहिती के. एस. होसाळीकर यांनी ट्विटरद्वारे दिलीय.
Latest satellite image indicating the cloud spread/intensity across Konkan, Madhya Mah and parts of Marathwada at 20.20hrs
Nowcast issued by IMD for all these regions for possibility of TS?? associated with lightning &mod to intense rains.
Keep watch on IMD updates@RMC_Mumbai pic.twitter.com/KlCpmduY4X— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 2, 2021
सध्या राज्याच्या अनेक भागांमध्ये पूर्वमोसमी पाऊस बरसत आहे. मुंबई आणि उपनगराच्या परिसरात बुधवारी सकाळपासून पुन्हा एकदा ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. काल मुंबईत पावसाच्या तुरळक सरी बरसल्या होत्या. आजदेखील सकाळपासून हलकासा पाऊस पडताना दिसत आहे. त्यामुळे मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका झाली आहे. मात्र, मान्सूनचा पाऊस मुंबईसह राज्यभरात कधी येणार, याची प्रतिक्षा आता सर्वांना लागली आहे.
कराड शहर व आसपासच्या परिसरात मंगळवारी झालेल्या ढगफुटी सदृश्य जोरदार पावसाने अनेक ठिकाणी पाणी भरुन राहिले होते. मलकापुर कराड परिसरात घरामध्ये पाणी घुसून मोठे नुकसान झाले. रस्ते व गटारामधुन मोठे पाणी वाहत होते ग्रामीण भागात शेतातील बांध फुटून पाणी वाहत होते. ढगफुटी सदृश्य जोरदार पावसाचा सातारचे खासदार श्रीनिवास पाटील यांनाही बसला आहे कराड गोटे येथील निवासस्थानी जोरदार पाऊसाचे पाणी भरल्याने त्यांच्या कार्यालयासह निवासस्थान जलमय झाले होते.
पिंपरी-चिंचवडमधील पाणीपुरवठा गुरुवारी संध्याकाळी बंद, तर शुक्रवारी विस्कळीत राहणार https://t.co/5TvFGKRYNI @PCcityPolice @AjitPawarSpeaks @InfoDivPune #pimprichinchwadcommissioner #PimpriChinchwad #WaterSupply #WaterCutOff
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 2, 2021
संबंधित बातम्या :
Weather Alert: मान्सूनचा पाऊस वेशीवर दाखल; कोकण किनारपट्टीवर काळ्या ढगांची गर्दी
heavy rains in Konkan, Central Maharashtra, Marathwada in next few hours