पुणे – वेगवान वाहतुकीचे जाळे निर्माण करणाऱ्या मेट्रोतून प्रवासाचे (Pune Metro ) पुणेकरांचे स्वप्न अखेर सत्यात उतरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन झाल्यानंतर पुणेकरांना त्याच दिवशी मेट्रोतून प्रवास करता येणार आहे. एकाच वेळी पुणे आणि पिंपरीतील (Pune and Pimpri) दोन्ही मार्गिकांवर मेट्रोची सेवा नागरिकांसाठी खुली केली जाणार आहे. पुणे आणि पिंपरीत दिवसभरात एकूण 13 तास मेट्रो धावणार असून, दार अर्ध्या तासाला मेट्रोची फेरी असणार आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर दुपारी तीननंतर सर्वसामान्य नागरिकांना मेट्रोतून प्रवास करता येणार आहे. तसेच सात मार्चपासून सकाळी आठ ते रात्री नऊ या वेळेत दर अर्ध्या तासाने धावणार आहे.
प्रतीक्षा संपली…ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊया…!
प्रवाशांसाठी #पुणेमेट्रो ची सेवा ६ मार्च २०२२ रोजी दुपारी ३ वाजेपासून सुरु !
दरपत्रक जाणून घ्या, तुमच्या स्वप्नाचा प्रत्यक्षात अनुभव घ्या.#AaliApliMetro #DreamComingTrue #DhavnaarApliMetro #WeAreReady pic.twitter.com/VT7VUUNoJl
— Pune Metro Rail (@metrorailpune) March 5, 2022
मेट्रोमधून प्रवास करत असताना नागरिकांना गरवारे कॉलेज, नळस्टॉप ते आयडीयल कॉलनी पर्यंत 10 रुपये तिकिट असणार आहे. त्यानंतर गरवारे कॉलेज ते आंनद नगरच्या चौथ्या स्टॉपसाठी 20 रुपये तिकीट मोजावे लागणार आहे. तर गरवारे कॉलेज ते वनाज स्टॉप पर्यंतच्या प्रवासासाठीही 20 रुपये तिकीट मोजावे लागणार आहे. गरवारे कॉलेज ते वनाज पर्यंतच्या मेट्रोचे मार्गवर नळस्टॉप, आयडीयल कॉलनी, आंनद नगर, ही स्थानके असणार आहेत.
पिंपरी चिंचवड महानगर पालिका ते फुगेवाडी दरम्यानच्या मेट्रो प्रवासासाठीही पहिल्या तीन स्थानकानांसाठी 10 रुपये तिकीट असणार आहे. त्यानंतरच्या तिसरी व चौथ्या स्टेशनासाठी 20 रुपये तिकीट आकारण्यात येणार आहे. पीसीएमसी ते फुगेवाडी दरम्यानच्या महामार्गावर संत तुकाराम नगर , भोसरी, कासारवाडी, फुगेवाडी ही स्थानके असणार आहेत.
पुणे व पिंपरी चिंचवड येथील मेट्रोचे तीन डब्बे असणार आहे. यामध्ये एका डब्यात 325 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे. एका वेळी तब्बल 975 प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. यामधी एक डबा महिलांसाठी राखीव असणार आहे.