मावस भावासोबत धरणाच्या बॅक वॉटरमध्ये पोहायला गेला होता, मात्र पुन्हा परतलाच नाही !

| Updated on: Apr 27, 2023 | 1:48 PM

दोघे मावस भाऊ धरणावर पोहायला गेले होते. 17 वर्षाच्या मुलाने पाण्यात उडी घेतली मात्र पुन्हा बाहेर आलाच नाही. ही उडी त्याची अखेरची ठरली.

मावस भावासोबत धरणाच्या बॅक वॉटरमध्ये पोहायला गेला होता, मात्र पुन्हा परतलाच नाही !
पुण्यात धरणात अल्पवयीन मुलगा बुडाला
Image Credit source: TV9
Follow us on

विनय जगताप, पुणे : मावसभावासह भाटघर धरणाच्या बँक वॉटरमध्ये पोहायला गेलेल्या 17 वर्षाच्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली आहे. पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर रात्री उशिरा मृतदेह शोधण्यात स्थानिक रेस्क्यू टीमला यश आले आहे. पुण्याच्या भोर तालुक्यातील बसरापूर येथे ही घटना घडली. घटनास्थळी खबर मिळताच भोर पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि तहसीलदार यांनी मृतदेह बाहेर काढण्यास महत्वाचे सहकार्य केले. या घटनेमुळे मुलाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पाण्याचा अंदाज न आल्याने मुलगा बुडाला

भोर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे बसरापूर गावच्या हद्दीत स्मशानभूमीच्या बाजूस भाटघर धरणाच्या बॅक वॉटरमध्ये दोघे मावस भाऊ बुधवारी सायंकाळी पोहायला गेले होते. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने मुलगा पाण्यात बुडाला. घटनेची माहिती मिळताच भोर पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि तहसीलदार, स्थानिक रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाले. रेस्क्यू टीमने सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत शोधकार्य करत मृतदेह शोधून काढला.

घटनास्थळी भोर मुळशीचे प्रांत अधिकारी राजेंद्र कचरे, भोर तहसीलदार सचिन पाटील, सर्कल धर्माकांबळे, पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक श्रीकांत जाधव, पोलीस हवालदार उद्धव गायकवाड, विकास लगस, दत्तात्रय खेंगरे, निलेश सटाले, सहकारी आणि भोईराज रेस्क्यू जल आपत्ती व्यवस्थापनचे सदस्य तसेच सह्याद्री रेस्क्यू टीमचे सदस्य उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा

नीरा नदीत पोहताना तरुणाचा मृत्यू

पुण्याच्या भोर तालुक्यातील शिंद गावात नीरा नदीत पोहताना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दोन दिवसापूर्वी घडली. निशिकांत संभाजी मोहिते असं मृत्यू झालेल्या 25 वर्षीय तरुणाचं नाव आहे. नदी पात्रात पोहताना दम लागल्याने तरुणचा बुडून मृत्यू झाला.