पुणे – शहरातील लोकल वाहतुकीचा कणा म्हणून पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे (PMP) पहिले जाते. शहरात वाहतुकीसाठी मोठ्याप्रमाणात बसेस ( Bus) वापरल्या जातात. मात्र आता पीएमपीला सीएनजी(पुणे महानगर परिवहन) पुरवठ्याबाबत मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे. सीएनजीचा पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएलची) थकीत बिले ना भरल्याने सीएनजी पुरवठा बंद करण्याचा इशारा एमएनजीएलने दिला आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळा प्रशाशनाकडं एकूण 35 कोटीची थकबाकी आहे. ही थकबाकी तातडीने भरण्यात यावी अन्यथा सीएनजीचा पुरवठा थांबवण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. येत्या 14 जून पासून हा पुरवठा बंद करण्यात येणार आहे. यामुळे बिलाचा भरणा ना झाल्यास तब्बल अकराशे बसेस सीएनजीच्या पुरवठ्या अभावी जागेवरच उभय राहतील अशी भीती निर्माण झाली आहे.
पुणे परिवहन महामंडळाच्या ताफ्यात एकूण अठराशे बसेस आहेत. त्यातील जवळपास अकराशे बसेसया सीएनजीवर चालवल्या जातात. यापैकी 300 बसेस या स्वतः पीएमपीच्या आहेत तर 200 बसेस कंत्राटी पद्धतीने चालावल्या जातात. याचबरोबर उरलेल्या बसेस भाडेतत्त्वावर चालवायला जातात. या बसेसना
एमएनजीएल कडून सीएनजीचा पूरवठा केला जातो. मात्र गेल्या काही काही काळात एमएनजीएलचे तब्बल35 थकबाकी पीएमपीकडे आहे. थकबाकी भरण्यासाठी अनेकदा पत्रव्यवहारही करण्यात आला आहे. मात्र अद्यापही थकबाजी भरण्यात आलेली नाही
सीएनजीच्या पुरवठ्यापोटी पीएमपीने काही रक्कम यापूर्वी एमएनजीएलकडे भरली. आताही पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे निधीची मागणी करण्यात आली आहे आणि हा निधी उपलब्ध झाल्यावर तातडीने सीएनजीची बिले भरण्यात येतील, आणि प्रवाशांची अडचण होणार नाही, अशी व्यवस्था करण्यात येईल, अशी माहिती पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रविण आष्टीकर यांनी दिली आहे.