पुणे : केरळ, महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातला तडाख्या दिलेल्या तौत्के चक्रीवादळापाठोपाठ आता यास चक्रीवादळ उद्या पश्चिम बंगालच्या समुद्र किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे पुढील 48 तासांत मान्सून पश्चिम बंगालच्या पूर्व भागात दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, यास चक्रीवादळ पारादीप आणि बालासोर इथं धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. बंगालच्या उपसागरात यास चक्रीवादळाचं रुपांतर अतितीव्र चक्रीवादळामध्ये झाल्यानं पश्चिम बंगाल सरकारच्या चिंतेत अधिक भर पडलीय. (monsoon is expected to reach West Bengal in next 48 hours)
पश्चिम बंगालच्या समुद्र किनाऱ्यावर यास चक्रीवादळ उद्या धडक देणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. इतकंच नाही तर यास चक्रीवादळ आणि मान्सून एकाच वेळी दाखल होण्याची शक्यताही वर्तवण्यात आलीय. त्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल आणि ओडीशाच्या किनारपट्टी भागातील जिल्ह्यांना हायअलर्ट देण्यात आला आहे. इकडे राज्यात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे वेधशाळेनं हा अंदाज वर्तवला आहे.
#Monsoon2021 Update 11
मॉन्सूनने आज मालदीव – कोमोरीन क्षेत्राच्या काही भागांसह नैऋत्य आणि मध्य पूर्व बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग व्यापला. पुढील ४८ तासांत मॉन्सून पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत पोचण्याचा अंदाज – आयएमडी. pic.twitter.com/N3OJoyu7SX— Mayuresh Prabhune (@mayureshgp) May 25, 2021
प्रत्येक चक्रीवादळाला कुठले ना कुठले नाव दिलेले असते. हे नाव वेगवेगळे देश देत असतात. नुकतेच धडकून गेलेल्या ‘तौक्ते’ चक्रीवाळाला म्यानमारने नाव दिले होते. अगदी तशाचप्रकारे ‘यास’ वादळाला ओमानच्या नावावरून नाव पडले आहे. वादळांना नाव देण्याची एक निर्धारीत प्रक्रिया आहे. त्याच प्रक्रियेला अनुसरून ‘यास’ वादळाचे नावही निर्धारीत प्रक्रियेनंतर ठेवले गेले आहे. ‘यास’ हा पर्शियन भाषेतील शब्द आहे, ज्याचा इंग्रजीमध्ये अर्थ ‘जॅस्मिन’ असा आहे. चक्रीवादळ ‘यास’ची परिणामकारकता लक्षात घेऊन ओडिसा, पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागात नॅशनल डिजास्टर रिस्पॉन्स फोर्सची ((NDRF) पथके जागोजागी तैनात करण्यात आली आहेत. किनारपट्टी भागात लोकांना वादळाच्या धोक्याविषयी वारंवार सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. बंगालच्या प्रशासनाकडून स्थानिक नागरिकांशी विशेषत: मेदनापूर, सुंदरवन आणि आसपासच्या भागातील रहिवाशांशी सातत्याने संपर्क साधला जात आहे.
‘यास’ चक्रीवादळ हे ओमानमधून आले आहे. या वादळाच्या वाऱ्यांचा वेग ताशी 50 किलोमीटर इतका आहे. या वादळाचे केंद्र पश्चिम बंगालची राजधानी कोलकातापासून सुमारे 750 किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगितले जात आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव 48 तास राहील. वादळ भीषण रूप धारण करून हाहाकार उडवून देणार आहे. याचा प्रभाव विशेषत: उत्तर-पश्चिम दिशेने ओडिसा आणि पश्चिम बंगालमध्ये दिसून येईल. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 25 मे रोजी उशिरा रात्री किंवा 26 मे रोजी सकाळी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिसा या दोन्ही राज्यांनी वादळाच्या भीषण परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सर्वतोपरी तयारी केली आहे.
Majestic Structure
SCS Yaas at 1130 hrs 25May is abut 220km SSE Paradip, 330km SSE Balasore, 320km SSE Digha-WB, 320kms S of Sagar Islands WB.
Vry likely to cross N Odisha-WB coasts betn Paradip & Sagar Island close to N of Dhamra & S of Balasore, noon of 26 May as a VSCS.
IMD pic.twitter.com/VuNtRGUn1T— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 25, 2021
संबंधित बातम्या :
‘तौक्ते’ पाठोपाठ ‘यास’ चक्रीवादळाचा फेरा; नेमके कोठून आले हे वादळ? जाणून घ्या सविस्तर माहिती
Weather Updates: पुणेकरांनो सावधान! विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता
monsoon is expected to reach West Bengal in next 48 hours