Pune : पुणे पोलीस दलावर शोककळा, माऊंट एव्हरेस्ट सर केल्यानंतर घेतला जगाचा निरोप

| Updated on: Jun 07, 2023 | 10:40 PM

Swapnil Garad : पुणे पोलीस दलातील कर्मचारी गिर्यारोहक स्वप्नील गरड यांचा निधन झालं आहे. माउंट एव्हरेस्ट सर केल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली आणि बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

Pune : पुणे पोलीस दलावर शोककळा, माऊंट एव्हरेस्ट सर केल्यानंतर घेतला जगाचा निरोप
Follow us on

पुणे : माऊंट एव्हरेस्ट सर केल्यानंतर पुणे पोलीस दलातील कर्मचारी गिर्यारोहक स्वप्नील गरड यांचा निधन झालं आहे. माउंट एव्हरेस्ट सर केल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली होती. माऊंट एव्हरेस्टवर ब्रेन डेड झाला होता. त्यानंतर त्यांना काठमांडूतील हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं. मात्र आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गरड यांच्या निधनाने पुणे पोलीस दलासह त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

स्वप्निल गरड यांनी जगातील सर्वात उंच शिखर केलं होतं, त्यानंतर त्यांचं सर्वत्र कौतुक झालं होतं. मात्र त्यांना या कामगिरीचा आनंद त्यांना फार काही दिवस घेता आलं नाही.  गरड यांच्या मृत्यूनंतर  पोलीस दलासह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

पुणे पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेत ते कार्यरत होते.  1 एप्रिलपासून ते सुट्टीवर असल्याची माहिती समजली. यामध्ये त्यांनी एव्हरेस्ट सर करण्याचं ठरवलं, त्याप्रमाणे त्यांनी मोहिमही फत्ते केली. एव्हरेस्ट सर केल्यावर त्यांनी हातात अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती हातात घेतलेली पाहायला मिळालं होतं.

स्वप्नील गरूड यांनी याआदी नेपाळमधील माउंट अमा दबलम हे शिखर यशस्वीपणे सर केलं होतं. शिखर सर केल्यावर त्यांनी तिरंगा ध्वज फडकावला होता. गरड यांनी माऊंट एव्हरेस्ट सर केल्यावर त्यांना हवामान बाधल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, बेस कॅमकडे परतत असताना त्यांना त्रास होऊ लागला आणि त्यांची प्रकृती खालावत गेली. काठमांडू येथील हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान “ब्रेन डेड’ घोषित करण्यात आलं होतं. मात्र बुधवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.