पुणे : पुण्यातील छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड (Pune market yard) परिसरात दलित पँथरचे (Dalit Panthers)प्रशासनाच्या विरोधात आक्रमक आंदोलन सुरु झाले आहे्. विशेष म्हणजे मार्कट मार्केट यार्ड परिसरात लिंबू-मिरची विकणाऱ्या विक्रेत्यांच्या कारवाई विरोधात हे आंदोलन सुरु आहे. कार्यकर्ते भल्या पहाटेच रस्त्यांवर उतरले असून मार्केटच्या यार्ड प्रशासनाविरोधात (Administration)हे आंदोलन सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. आंदोलनामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. त्याचबरोबर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी सुध्दा झाली आहे.
पुण्यातील मार्केट यार्ड परिसरामध्ये काही लिंबू विक्रेते आणि मिरची विक्रेते हे अनधिकृतपणे विक्री करतात असा प्रशासनाचा दावा आहे.
त्यामुळे प्रशासनाने अनधिकृत विक्रेते त्याचबरोबर छोटे भाजी विक्रेते यांना मार्केटयार्ड मध्ये बसून विक्री करण्यास मनाई केलेली आहे. या सर्वांमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि अडचण लक्षात घेता हा निर्णय घेतला असल्याचे मार्केट यार्ड प्रशासनाने सांगितलेलं होतं. काही दिवसापूर्वीच लिंबू विक्रेत्याकडून मोठा आंदोलन मार्केट यार्ड परिसरात करण्यात आलेले होते. परंतु प्रशासनाने त्याची दखल घेतली नव्हती आणि त्याचबरोबर प्रशासनाने आपला निर्णय बदलण्यास नकार दिला होता.