पुणे- पुणे- जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी व मावळमध्ये बैलगाडा शर्यती (Bullock cart race)पार पडल्या. त्यानंतर आज दावडी निमगावच्या यात्रेत बैलगाडा शर्यतीची बारी भरवण्यात आली होती. यामध्ये एकूण 350 बैलगाडा मालक सहभागी झाले होते. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे (MP Dr. Amol Kolhe)यांनी स्वतः दावडी निमगावच्या घाटात घोडी धरत मतदारांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे. इतकच नव्हे तर बैलगाडा शर्यतीवरुन शिरून मतदार संघातून विरोधक शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील( ShivSena leader Shivajirao Adhalrao Patil)यांच्या आव्हानालाही चोख उत्तर दिले आहे. यातूनच शिरूर मतदार संघात बैलगाडा शर्यतींवरून राजकीय वाद रंगल्याचे चित्र दिसून आले आहे. यापूर्वी शिवसेने नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली लांडेवाडी येथे भव्य अशी बैलगाडा शर्यत भरवण्यात आली होती.
आढळरावांनी दिले होते आव्हान
लोकसभेच्या निवडणुक प्रचारा दरम्यान, बैलगाडा शर्यत सुरू होताच, पहिल्या बारीत घोडीवर बसेन, असे आश्वासन खासदार कोल्हे यांनी दिले होते. कोल्हेंच्या या आश्वासनाची आठवण करुन देत आढाळरावांनी त्यांना निमगावच्या घाटात येण्याचे खुले आव्हान दिले. ‘खासदार अमोल कोल्हे यांनी माझ्या गावातील घाटात बैलगाडा शर्यतीत भाग घेऊन घोडीवर बसावं आणि निवडणुकीच्या प्रचारात दिलेला शब्द सत्यात उतरवावा, असे त्यांनी म्हटलं होत. डॉ. अमोल कोल्हे यांनीही रुबाबदार एंट्री मारत घोडी धरून आढळराव पाटलांनी दिलेलं आव्हान पूर्ण केलं.
डॉ. अमोल कोल्हे यांनीही रुबाबदार एंट्री मारत, पहिल्या बारीत घोडीवर बसेन हे आश्वासन पूर्ण केलं
अश्या लोकांच्या आक्षेपाला उत्तर देणे मला स्वागर्ताह वाटत नाही
जिल्ह्यात पहिली शर्यत झाली, तेव्हा संसदेतअधिवेशन सुरु होत. ज्यांची संसदेतील उपस्थितीच 50-55 टक्के आहे. 15 वर्षाच्या कालावधीत ज्यांना आपल्या भाषणातून एकदाही छाप पाडता आली नाही. अश्या लोकांच्या आक्षेपाला उत्तर देणे मला स्वागर्ताह वाटत नाही. बसायचं असत तर तिकडेही बसू शकलो असतो. पण तिकडे बसलो असतो तर त्यांना जास्त त्रास झाला असता. अन वयोमानापरत्वे त्यांना त्रास होऊ नये अशी माझी इच्छा होती. असा टोला डॉ. कोल्हे यांनी आढळराव पाटलांचे नाव न घेता त्यांना लगावला आहे . शर्यत सुरु झाली ही खरचं खूप आनंदाची गोष्ट आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे, महाविकास आघाडी सरकारचे मी मनापासून आभार मानतो. यामुळे बैल बाजारातील बैलाची खरेदी विक्री सुरु झाली. यामुळे ग्रामीण अर्थकारणाला गती मिळाली आहे. यापुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर बैलगाडा शर्यतीला स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार.
डॉ. अमोल कोल्हे यांनीही घोडी धरून आढळराव पाटलांनी दिलेलं आव्हान पूर्ण केलं.
विरोधकांनी आत्मपरीक्षण करावं
बैलगाडा शर्यतीवर विरोधक घेतायत याला उत्तर देताना अमोल कोल्हे म्हणाले, ज्यांनी कुणी घेरायचा प्रयत्न केला त्यानी ,आत्मपरीक्षण कराव . ज्यांच्याकडे जेव्हा पद होता तेव्हा बैलगाडा शर्यत सुरु होऊ शकली का ? कारण सर्वसामान्य शेतकरी जाणतो. बैलगाडा मालक जाणतो की शिरुर मतदार संघानं माझ्यावर विश्वास दाखवल्यानंतर सातत्याने संसदेत हा मुद्दा मी लावून धरू शकलो. हे सगळं यश शिरुर लोकसभा मतदार संघाचं आहे. मला प्रामाणिकपणे अस वाटतंय की बैलगाडा शर्यतीमध्ये कोणत्याही प्रकारच राजकारण न आणता या बैलगाडा शर्यतीला आणखी मोठ्या स्टेजवर नेता येईल याचा विचार करूया असे मत डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केलं आहे.
Zodiac | …म्हणूनच बप्पी दा भरपूर सोने घालायचे, राशीं सोबत आहे त्यांचा थेट संबंध
Video : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं संत रविदास यांना अभिवादन,नवी दिल्लीत कीर्तनात सहभाग
रसिका सुनिलचा लेट पण थेट व्हॅलेंटाईन डे!, फोटो शेअर करत म्हणाली…