पुणे: आर्थिक दुर्बल घटक अर्थात EWSचा धोरणात्मक निर्णय सरकारनं घेऊ नये, अशी भूमिका खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली आहे. EWS आरक्षणाला माझा विरोध नाही, पण याचा धोका SEBC ला होणार नाही, याची हमी सरकार घेणार का? असा सवालही संभाजीराजे यांनी केलाय. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर आता 25 जानेवारीला सुनावणी होणार आहे. (MP Sambhaji Raje criticizes the state government)
“आतापर्यंत मी सरकार सकारात्मक असल्याचं म्हणत होतो. पण आता आपल्याला गडबड वाटत आहे. 25 जानेवारीला मराठा समाजाच्या आरक्षणावर सुनावणी होणार आहे. पण त्याआधीच सरकार हतबल झाल्यासारखं वाटत आहे. म्हणून हा EWSचा मुद्दा रेटला जात आहे का?” असा प्रश्न संभाजीराजे यांनी विचारलाय. सरकार ठोस भूमिका घ्यायला तयार नाही. सरकारच्या भूमिकेत आता आपल्याला गडबड दिसून येत असल्याचं खळबळजनक वक्तव्य संभाजीराजे यांनी केलंय. येत्या 25 जानेवारीच्या सुनावणीत काही गडबड झाली तर त्याला सरकार जबाबदार असेल, अशी आक्रमक भूमिका खासदार संभाजीराजे यांनी घेतलीय.
मराठा समाजाला बहुजन समाजापासून लांब ठेवलं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांचा वंशज असल्यानं हे आपल्या लक्षात आल्याचं संभाजीराजे म्हणाले. विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे असं सांगत आर्थिक दुर्बल घटक म्हणून कालच्या बैठकीत आरक्षण दिलं. मग सूपर न्यूमर पद्धतीनं ठरलेलं असताना अचानक EWSचा मुद्दा आला कुठून? असा प्रश्न संभाजीराजेंनी राज्य सरकारला विचारला आहे.
..मग ‘सारथी’ बंद करा- संभाजीराजे
शाहू महाराज यांचा पुरोगामी विचार जपायचा असेल तर सारथी संस्थेच्या मुद्द्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लक्ष घातलं पाहिजे. सारथीच्या स्वायत्ततेचा मुद्दा वर्षभरापासून सुरु आहे. जर याबाबत निर्णय घेता येत नसेल, तर शाहू महाराजांच्या विचार मानणाऱ्यांनी ही संस्था बंद करावी. आपल्याला शाहू महाजारांचे पाईक म्हणवण्याचा अधिकार उरत नाही, अशी आक्रमक भूमिका खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली आहे.
“शाहू महाराजांनी 200 वर्षांपूर्वी बहुजन समाजाला आरक्षण दिलं. केवळ मराठ्यांना दिलं नाही. त्यावेळच्या बहुजनांमध्ये मराठा समाजाचाही समावेश होता. मात्र, आज मराठा समाज प्रवाहाच्या बाहेर का? मराठा समाजाला आरक्षण का नाही?” असा सवाल संभाजीराजे यांनी 8 नोव्हेंबरला नांदेडमध्ये झालेल्या सभेत राज्य सरकारला विचारला होता.
संबंधित बातम्या:
राज्य सरकार ऐकत नसेल, तर मराठा समाज MPSC ची केंद्रं बंद पाडणार : संभाजीराजे
शाहू महाराजांनी बहुजनांना आरक्षण दिलं, आता मराठा समाजाकडे कोण लक्ष देणार? : संभाजीराजे
MP Sambhaji Raje criticizes the state government