रायगड : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर विचित्र अपघातात एका इंजिनिअरचा मृत्यू झाला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुरुस्तीचं काम सुरु आहे. त्यावेळी दुरुस्तीच्या कामात वापरल्या जाणाऱ्या रोलरखाली चिरडून एका इंडिनिअरचा मृत्यू झालाय. रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे. अपघात झाल्यानंतर रोलर ऑपरेटर घटनास्थळावरुन फरार झाला आहे. पुढील तसाप रसायनी पोलिस करत आहेत.(Engineer dies while inspecting road repair work on Mumbai-Pune Expressway)
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर दोन्ही बाजूंनी सध्या दुरुस्तीचं काम सुरु आहे. दोन्ही बाजूंच्या चौथ्या लेनवर भेगा पडल्याचं पाहायला मिळत आहे. या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी हे दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे. त्यावेळी मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या रस्त्यावरही दुरुस्ती केली जात आहे. तिथे या कामाची पाहणी करण्यासाठी असलेल्या इंजिनिअरचा रोलरखाली चिरडून मृत्यू झाला आहे. मनोज जगदाळे असं या मृत इंजिनिअरचं नाव आहे. तो 24 वर्षांचा होता. अपघातानंतर रोलर ऑपरेटर फरार झाला असून त्याचा शोध घेतला जात आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील खोपोली ते कुसगाव या नवीन मार्गिकेच्या बांधकामाची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील महिन्यात केली होती. त्यानंतर प्रकल्प कॅम्प कार्यालयात सुरु असलेल्या बांधकामाच्या कामाचा दर्जा आणि गुणवत्तेची माहिती त्यांनी जाणून घेतली.
>> मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील खोपोली ते कुसगाव दरम्यान नवीन मार्गिकेच्या प्रकल्पांतर्गत खालापूर टोलनाका ते लोणावळा पर्यंत मुंबई-पुणे एक्सप्रेस वेची क्षमता वाढ करणे प्रस्तावित आहे.
>> या प्रकल्पाची एकूण लांबी 19.80 किलोमीटर आहे. या प्रकल्पांतर्गत खालापूर ते खोपोली इंटरचेंज या अस्तित्वातील 5.86 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे 8 पदरीकरण करणे
>> खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागातील 13.3 किलोमीटर राहिलेल्या लांबीमध्ये 2 बोगदे आणि 2 व्हायाडक्ट बांधणे.
संबंधित बातम्या :
Engineer dies while inspecting road repair work on Mumbai-Pune Expressway