मुंबई : मुंबईतील सार्वजनिक बांधकाम अभियंत्याविरोधात बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिला पोलिसाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. 47 वर्षीय महिला पोलीस हवालदाराने पिंपरी चिंचवडमध्ये आयुष्य संपवलं. पंधरा दिवसांपूर्वी संबंधित महिलेने वरळी पोलिसात बलात्काराची तक्रार नोंदवली होती. (Mumbai Rape survivor woman Police commits suicide in Pune)
लग्नाच्या आमिषाने बलात्कार
तक्रारदार महिलेच्या पतीनेही चार वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता असलेल्या आरोपीने लग्नाच्या आमिषाने आपल्यावर वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केला. त्यानंतर लग्नास नकार दिला, असा दावा तक्रारदार महिलेने गेल्या पंधरवड्यात वरळी पोलिसात केलेल्या तक्रारीत केला होता.
पोलीस पतीची आत्महत्या
महिलेला डिप्रेशनचा त्रास असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. संबंधित पहिला पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात कार्यरत होती. तिचा पतीही पोलीस हवालदार होता. त्याने चार वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. ‘हिंदुस्तान टाइम्स’ वृत्तपत्राच्या वेबसाईटवर यासंबंधी बातमी आहे.
विधवा पुनर्विवाह संस्थेत ओळख
विधवा पुनर्विवाह करणाऱ्या पुण्यातील एका संस्थेत 47 वर्षीय तक्रारदार महिलेने नाव नोंदवले होते. तिथे तिला 53 वर्षीय आरोपी अजय बनसोडे याचा संपर्क क्रमांक मिळाला. बनसोडे हा सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे. बनसोडेने आपण घटस्फोटित असल्याचे सांगत महिलेशी विवाहाचे वचन दिले होते. (Mumbai Rape survivor woman Police commits suicide in Pune)
सप्टेंबर 2019 ते 22 डिसेंबर 2020 या कालावधीत बनसोडेने आपल्यावर अनेक वेळा बलात्कार केला, असा आरोप तिने 14 जानेवारीला वरळी पोलिसात केलेल्या तक्रारीत केला. वरळीतील राहते घर आणि पनवेलमधील दोन ठिकाणी आपल्यावर अत्याचार झाल्याचा दावा तिने केला. बनसोडेच्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचं नंतर महिलेला समजलं.
पवना नदीत महिलेची उडी
26 जानेवारीला पवना नदीत महिलेने आत्महत्या केली. तिने लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना सापडलेली नाही. तिच्या कुटुंबीयांच्या माहितीनुसार ती नैराश्यात होती, असं सांगवी पोलिसातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी सांगितलं. “तक्रारदार महिलेला आत्महत्येसाठी कोणी उद्युक्त केल्याचे पुरावे अद्याप सापडलेले नाहीत” अशी माहिती तपास अधिकारी कविता रुपनर यांनी दिली.
संबंधित बातम्या :
रडणाऱ्या चिमुकलीसाठी आईने पाच रुपये मागितले, बापाने दरवाजावर आपटल्याने मुलीचा मृत्यू
मॉर्निंग वॉकला गेल्या अन् परतल्याच नाहीत, जालनामधून सावध करणारी बातमी!
(Mumbai Rape survivor woman Police commits suicide in Pune)