पुणे – पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation)नव्याने २३ गावांचा समावेश झाला आहे. यापैकी काही गावांचा कचरा(Garbage) उचलणे तसे त्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम करण्याच्या निविदेस महानगर पालिकेनं मंजुरी दिली आहे. महापालिकेचा कार्यकाळ संपल्यानंतर महापालिकेवर प्रशासकीय राज सुर झाला आहे. त्यानंतर महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Municipal Commissioner Vikram Kumar) यांनी नुकतीच बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी य विषयाला मंजुरी दिली आहे. 23 पैकी सूस, महाळुंगे, बावधन तसेच कोंढवे, धावडे या चार गावांचा कचरा उचलण्यात येणार आहे. यासाठी तब्बल 3 कोटी 10 लाख रुपयांच्या निविदेस मंजुरी दिली आहे.
या गावांमध्ये कचरा संकलन तसेच प्रक्रियेची व्यवस्था नसल्याचे सांगत प्रशासनाने यासाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. याद्वारे पुढील वर्षभरात संकलन, वाहतूक तसेच प्रक्रियेचा खर्च समाविष्ट आहे. उर्वरित 19 गावांमध्ये कचरा संकलन व्यवस्था असून तो संकलित झाल्यानंतर महापालिका त्याची वाहतूक तसेच प्रक्रिया करत असल्याने या गावांसाठी या कामाची गरज नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. या चार गावांत दररोज सुमारे 100 टन कचरा निर्माण होतो. हा कचरा संकलन, वाहतूक तसेच त्यावर प्रक्रिया करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नव्हती. त्यामुळे या कामासाठी निविदा काढण्यात आल्या होत्या.
याबरोबरच पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतही मोठ्याप्रमाणात कचरा निर्माण होत आहे. या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतलं आहे. या प्रकल्पासाठी कॅंटोन्मेंट बोर्डाकडून जागा दिली जाणार आहे. या प्रकल्पासाठीचे प्रक्रिया शुल्क तसेच कचरा वाहून नेण्यासाठीचे शुल्क देण्यात येणार आहे.