देशात पुन्हा एकदा एनडीए सरकार सत्तेत आलं आहे. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मोदींसोबतच 72 मंत्र्यांचा काल शपथविधी सोहळा पार पडला. यात पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांचा समावेश होता. पहिल्यांदाच खासदार झालेल्या मुरलीधर मोहोळांची मंत्रिपदी वर्णी लागली. याचं महायुतीकडून स्वागत झालं. तर विरोधी पक्षांनी मात्र टीका केली. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका केली आहे. पुण्याला मंत्रीपद मिळालं आहे. चांगली गोष्ट आहे. मात्र या मंत्रिपदाचा कंत्राटदारांना फायदा न होता. सर्व सामान्य लोकांना व्हावा, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.त्याला आता मोहोळांनी प्रत्युत्तर दिलंय.
सुप्रिया ताईंनी मला शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल मी आभार आहे. त्यांच्या टीकेला उत्तर मी देण्यापेक्षा पुणेकरांनी दिलं आहे. पुण्याची राजकीय संस्कृती आहे. 40 वर्षानंतर पुण्याला मंत्रिपद मिळालं आहे. ताईंची मळमळ बाहेर आलीय. मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही. ते पूर्ण झाल नसल्यामुळ त्यांनी मला खास शुभेच्छा दिल्यात. ठेकेदारांची भाषा ताई बोलायला लागल्यामुळे आजुन हसू येत आहे. कोणाच्या प्रॉपर्टी कुठं आहेत, हे जनतेला माहित आहे. पुढच्या काळात आम्ही कार्यकर्ते जशास तसे उत्तर देऊ, असं मुरलीधर मोहोळ म्हणालेत.
मा. सुप्रियाताई,
शुभेच्छांबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद !
खरं तर जवळपास ४० वर्षांनंतर जनतेतून निवडून आलेल्या पुण्याच्या खासदाराला मंत्रीपदाची संधी मिळाली. ही बाब समस्त पुणेकरांना गौरवान्वित करणारी आहे आणि पुण्याची राजकीय संस्कृती पाहिली तर यांचं निखळ मनानेच स्वागत अपेक्षित होतं. असो, पण या निमित्ताने आपल्या कोत्या मनोवृत्तीचं दर्शनही पुणेकरांना घडलं.
ताई, आपली ‘मळमळ’ आम्ही समजू शकतो. माझ्यासारख्या सामान्य घरातील कार्यकर्त्याला थेट केंद्रीय मंत्रीपदावर संधी मिळणे, हे आपल्यासारख्या सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना लवकर पचणी पडणारे नाही. त्यामुळे आपली टिपण्णी स्वाभाविक मानतो.
उरला प्रश्न ठेकदारांचा, तर ठेकेदार कोणी पोसले? कोणी मोठे केले? पुण्यातील आणि महाराष्ट्राचे मोठे ठेकेदार कोणाचे पार्टनर आहेत? हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे असल्या तकलादू टिपण्णी करुन स्वतःचं हसं सोडून दुसरं काही होणार नाही.
मा. सुप्रियाताई,
शुभेच्छांबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद !खरं तर जवळपास ४० वर्षांनंतर जनतेतून निवडून आलेल्या पुण्याच्या खासदाराला मंत्रीपदाची संधी मिळाली. ही बाब समस्त पुणेकरांना गौरवान्वित करणारी आहे आणि पुण्याची राजकीय संस्कृती पाहिली तर यांचं निखळ मनानेच स्वागत अपेक्षित होतं.…
— Murlidhar Mohol (Modi Ka Parivar) (@mohol_murlidhar) June 10, 2024
श्रीरंग बारणे यांनी शिवसेनाला कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली. यावर मोहोळांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाराजी आहे असं वाटत नाही. आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत. वरिष्ठ पातळीवरील नेते बसून निर्णय घेतील. त्याचा कुठलाही परिणाम महायुतीवर होणार नाही, असं मुरलीधर मोहोळ म्हणाले.